पंतप्रधानांनी कोविड-19 संबधित परिस्थितीबद्दल काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद
July 16th, 12:07 pm
कोरोना विरुद्ध देश या लढाईतील अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर आपण सर्वांनी आपापले म्हणणे मांडलेत. दोन दिवसांपूर्वीच नॉर्थ ईस्टच्या सर्व मुख्यमंत्र्यांसह याच विषयावर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. कारण जिथे जिथे चिंताजनक परिस्थिती आहे प्रामुख्याने त्या त्या राज्यांसोबत मी याबद्दल चर्चा करत आहे.कोविडविषयक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
July 16th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक,ओदिशा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोविड बाबतच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्री आणि आरोग्य मंत्रीही यावेळी उपस्थित होते. कोविडशी लढा देण्यासाठी देण्यात येत असलेल्या सर्वतोपरी सहाय्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांचे आभार मानले. आपापल्या राज्यात, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलण्यात आलेली पावले आणि लसीकरणाची प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लसीकरण धोरणाबाबतही त्यांनी प्रतिसाद दिला.कोविड -19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन
April 20th, 08:49 pm
देश आज पुन्हा एकदा कोरोना विरोधात खूप मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वींपर्यंत परिस्थीती आटोक्यात होती. आता मात्र कोरोनाची ही दुसरी लाट वादळ होऊन आली आहे. जो त्रास तुम्ही सोसला आहे, जो त्रास तुम्ही सोसत आहात, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. गेल्या काही काळात ज्यांनी आपली माणसं गमावली, मी सर्व देशवासियांना कडून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. कुटुंबातील एका सदस्याच्या रूपात मी आपल्या दुःखात सहभागी आहे. आव्हान मोठं आहे. परंतु सगळे मिळून आपल्याला संकल्प, धैर्य आणि तयारीसह यावर मात करायची आहे.कोविड-19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण
April 20th, 08:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत देशाला उद्देशून मार्गदर्शन केले. या महामारीमध्ये अलीकडच्या काळात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सहभागी आहे. हे आव्हान खूप मोठे आहे आणि आपल्याला त्यावर निर्धाराने, धैर्याने आणि पूर्ण सज्जतेने एकत्रितपणे मात करायची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, सुरक्षा दले आणि पोलिस दले यांनी कोरोनाविरोधातील लढाईत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अभिवादन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
January 25th, 12:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2021 च्या विजेत्यांशी साधला संवाद
January 25th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.कोविड-19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 16th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
January 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.ब्लूमबर्ग नव-अर्थव्यवस्था मंचाच्या 17 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 17th, 06:42 pm
मायकल आणि ब्लूमबर्ग सेवाप्रतिष्ठानाचा चमू करत असलेल्या महत्वाच्या सामाजिक कार्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो. भारताच्या स्मार्ट सिटी अभियानाची रूपरेखा तयार करण्यात त्यांच्या चमूने केलेली मदत अत्यंत उपयुक्त ठरली.भारतात शहरीकरणात गुंतवणूकीसाठी उत्तम संधी असल्याचे सांगत पंतप्रधानांचे गुंतवणूकदारांना निमंत्रण
November 17th, 06:41 pm
मोदी म्हणाले की कोविड -19 नंतरच्या जगाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. मात्र पुनर्रचना केल्याशिवाय पुन्हा सुरुवात करणे शक्य नाही. मानसिकतेची पुनर्रचना, प्रक्रियांची पुनर्रचना आणि पद्धतींची पुनर्रचना. महामारीने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी दिली आहे. “जर आपल्याला भविष्यासाठी लवचिक प्रणाली विकसित करायची असेल तर ही संधी जगाने साधायला हवी. जगाच्या कोविडनंतरच्या गरजांविषयी आपण विचार केला पाहिजे. आपल्या शहरी केंद्रांचा कायाकल्प करणे ही एक चांगली सुरुवात असेल ”, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यावेळी केलेले भाषण
October 27th, 10:35 am
आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही वाटत आहे.PM Modi interacts with beneficiaries of PM SVANidhi Scheme from Uttar Pradesh
October 27th, 10:34 am
PM Narendra Modi interacted with beneficiaries of PM SVANIDHI Yojana from Uttar Pradesh through video conferencing. The Prime Minister said for the first time since independence street vendors are getting unsecured affordable loans. He said the maximum applications of urban street vendors have come from UP.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
October 25th, 11:00 am
मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.कृषी क्षेत्र, शेतकरी, खेडी हा आत्मनिर्भर भारताचा पायाः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
September 27th, 11:00 am
गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, व्यक्त होते. गोष्टीची खरी ताकत अनुभवायची असेल तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते, तेव्हा निरीक्षण करा. मी आयुष्यात दीर्घकाळ परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. भटकंती करणे हेच माझे आयुष्य होते. रोज नवे गाव, नवी माणसे, नवी कुटुंबे. या कुटुंबांसोबत मी राहत असे, तेव्हा मी तेथील बालकांसोबत गप्पा मारत असे आणि बरेचदा त्या बालकांना सांगत असे, चला, आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू.. त्यांची उत्तरे ऐकून मला आश्चर्य वाटे. मुले मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही किस्सा सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा किस्सा सांगण्याचाच आग्रह करत असत. म्हणजेच गोष्ट या प्रकाराशी त्यांचा परिचयच नव्हता आणि त्यांचे अवघे आयुष्य अशा किश्श्यांनीच समृद्ध झाले होते.‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद
September 24th, 12:01 pm
आज देशाला प्रेरणा देणाऱ्या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे आपण स्वतः अवलंबन करून, त्याचे लाभ घेतले आहेत, त्याविषयी माहिती सामाईक केलीत, त्याचा देशाच्या प्रत्येक पिढीला खूप फायदा होऊ शकेल, असे मला वाटते. आजची ही चर्चा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींसाठी आणि वेगवेगळी रूची, आवड असलेल्या सर्वांनाच अतिशय उपयोगी पडणारी ठरणार आहे. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व देशवासियांचे स्वास्थ्य, आरोग्य उत्तम राहावे, अशी कामना करतो.पंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ
September 24th, 12:00 pm
नरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडापटू, फिटनेस तज्ज्ञ आणि इतर व्यक्तींशी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात संवाद साधला. औपचारिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागितांनी पंतप्रधानांसमवेत आपले अनुभव आणि तंदुरुस्तीच्या बाबी सामाईक केल्या.कोविड प्रादुर्भावाचे आधिक्य असणाऱ्या सात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या आभासी माध्यमातील बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
September 23rd, 07:35 pm
आज आपण कोरोना संकटाविषयी बोलत असतांना देशाच्या आरोग्यविषयक इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, हा योगायोगच आहे.कोविड-19 ची स्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी पंतप्रधानांची चर्चा
September 23rd, 07:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोविड-19 ची स्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली.Govt is able to provide free food grains to the poor and the needy due to our farmers & taxpayers: PM
June 30th, 04:01 pm
In his address to the nation, Prime Minister Modi announced that the Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana will now be extended till the end of November. The biggest benefit of this will be to those poor people and especially the migrant workers. The PM also thanked the hardworking farmers and the honest taxpayers, because of whom the government was being able to provide free food grains to the poor.