लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधानांची भेट

June 24th, 09:46 pm

लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटनीयो कोस्टा यांनी संयुक्तपणे भेट दिली. शॅम्पलीमोद फाउंडेशन आणि हैदराबाद इथली प्रसाद इन्स्टिट्यूट यांच्यात परस्पर सामंजस्य असून,शॅम्पलीमोद फाउंडेशन मध्ये येणाऱ्या परदेशी रुग्णांमध्ये भारतातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पंतप्रधानांनी फाउंडेशनला भेट देऊन भारतीय संशोधकांसमवेत संवाद साधला.

भारत आणि पोर्तुगाल :अंतराळ ते खोल समुद्र अशा व्यापक क्षेत्रात सहकार्य

June 24th, 09:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लिस्बन भेटीत, भारत पोर्तुगाल अंतराळ युती निर्माण करण्याबाबत आणि संशोधन सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.या करारामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या, पोर्तुगालबरोबर असलेल्या भागीदारीला प्रोत्साहन मिळणार आहे. अटलांटिक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारणीलाही यामुळे प्रोत्साहन मिळेल.हे केंद्र, ट्रान्स-अटलांटिक साठी संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना, आणि ज्ञानाचे तसेच आणि उत्तर-दक्षिण सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय जाळे निर्माण केले जाईल. हवामान,अंतराळआणि सागरी संशोधनाला पोषक अशा वातावरणाची निर्मिती करून त्याला गती देण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते स्टार्ट अप पोर्टलचे उदघाटन

June 24th, 08:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांनी आज भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप हब चे (आयपीआयएसएच) लिस्बन इथे उदघाटन केले.स्टार्ट अप इंडिया द्वारे पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या या मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि स्टार्ट अप पोर्तुगाल यांचे पाठबळ आहे.उद्योजकतेसाठी भागीदारी करण्याच्या दृष्टीने हा मंच निर्माण करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे पोर्तुगालमध्ये आगमन

June 24th, 05:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्तुगालमध्ये लिस्बन इथे आगमन झाले. हा त्यांच्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याचा पहिला भाग आहे. पंतप्रधान, पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांना भेटतील आणि विविध क्षेत्रांत असलेले भारत पोर्तुगाल संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय वाटाघाटी करतील.