गुजरात मध्ये गांधीनगर इथे रि-इन्व्हेस्ट 2024 या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

September 16th, 11:30 am

गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडूजी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजन लाल शर्माजी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादवजी…. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीजी सुद्धा इथे दिसत आहेत, गोव्याचे मुख्यमंत्रीही आहेत आणि अनेक राज्यांचे ऊर्जामंत्रीही मला दिसत आहेत.त्याचप्रमाणे, परदेशी पाहुणे, जर्मनीच्या आर्थिक सहकार्य मंत्री, डेन्मार्कचे उद्योग व्यवसाय मंत्री, माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद जोशी, श्रीपाद नाईकजी आणि जगातील अनेक देशांमधून आलेले सर्व प्रतिनिधी, स्त्री-पुरुष सज्जनहो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे केले चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्‌घाटन

September 16th, 11:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्‌घाटन केले. ही तीन-दिवसीय शिखर परिषद भारताच्या 200 GW पेक्षा जास्त स्थापित बिगर-जीवाश्म इंधन क्षमता साध्यतेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करत आहे. मोदी यांनी यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनास्थळी पायी चालत आढावाही घेतला.

भारताच्या जी-20 अध्यक्षपदामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या क्षमता जगासमोर आल्या : पंतप्रधान

August 15th, 02:24 pm

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या बुरुजावरून आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताला मिळालेल्या जी-20 अध्यक्षपदामुळे, देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या क्षमता जगासमोर कशा आल्यात हे सविस्तर सांगितले. भारताच्या क्षमता आणि देशात उपलब्ध असलेल्या संधी - नवी ऊंची ओलांडणार असून, या वाढलेल्या आत्मविश्वासातून आणखी नव्या संधी निर्माण होतील, हे निश्चित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “भारताच्या जी-20 अध्यक्षपदामुळे, भारताच्या सर्वसामान्य लोकांची ताकद जगाला कळली आहे. आज भारताला जी-20 परिषदेचे यजमानपद भूषवण्याची जबाबदारी मिळाली आहे. आणि गेल्या वर्षभरापासून, ज्या प्रकारे जी-20 च्या अनेक बैठका देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक शहरात आयोजित केल्या जात आहेत, त्यामुळे सगळ्या जगाला देशातील सर्वसामान्य माणसाची क्षमता आणि ताकद कळली आहे.”

गांधीनगर इथे महिला सक्षमीकरण विषयक जी-20 मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेला संदेश

August 02nd, 10:41 am

मी आपल्या सर्वांचे गांधीनगरमध्ये स्वागत करतो. या शहराचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे आणि आज त्याचा स्थापना दिवस देखील आहे. मला अत्यंत आनंद आहे की आपल्याला अहमदाबादमध्ये गांधी आश्रमाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. आज संपूर्ण जग, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ अशा समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याच्या प्रासंगिकतेविषयी चर्चा करत आहे. गांधी आश्रमात आपण गांधीजी यांच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि समानता अशा सर्व बाबतीतल्या त्यांच्या द्रष्टया विचारांचे साक्षीदार बनणार आहेत. मला विश्वास आहे, की आपल्याला हे प्रेरणादायक ठरेल. दांडी कुटीर संग्रहालयात देखील आपल्याला असाच अनुभव मिळेल. ही संधी आपण आजिबात सोडता कामा नये. इथे एका गोष्टीचा उल्लेख करणे औचित्यपूर्ण ठरेल की, गांधीजींचा प्रसिद्ध चरखा, गंगाबेन नावाच्या एका महिलेकडे गावात मिळाला होता. आपल्याला माहितीच आहे, की त्यानंतर गांधीजी नेहमीच खादीचेच वस्त्र वापरत असत. ही खादी आत्मनिर्भरता आणि स्थैर्य यांचे प्रतीक बनली होती.

पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणावर आधारित जी-20 मंत्रीस्तरीय परिषदेला केले संबोधित

August 02nd, 10:40 am

उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी महात्मा गांधीजींच्या नावावरून नामकरण करण्यात आलेल्या गांधीनगर या शहराच्या स्थापना दिनानिमित्त मान्यवरांचे या शहरात स्वागत केले. या कार्यक्रमानिमित्त गांधीनगर येथे आलेल्या पाहुण्यांना अहमदाबाद मधील गांधी आश्रमाला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यांसारख्या समस्यांवर तातडीने आणि शाश्वत स्वरूपाच्या उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की गांधी आश्रमात आपल्याला गांधीजींच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि शाश्वतता, स्वावलंबन आणि समानतेविषयीच्या त्यांच्या दूरदर्शी संकल्पना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी मिळते. मान्यवरांना हे सर्व प्रेरणादायी वाटेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या मान्यवरांना दांडी कुटीर संग्रहालयाला भेट देता येईल असे देखील त्यांनी नमूद केले. गांधीजींचा सुप्रसिध्द चरखा जवळच्या गावात राहणाऱ्या गंगाबेन नावाच्या महिलेने तयार केला होता आणि तेव्हापासून गांधीजींनी खादीचा वापर सुरु केला आणि पुढील काळात जो स्वावलंबन आणि शाश्वतता यांचे प्रतीक बनला अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या 2022 च्या प्रशिक्षणार्थी तुकडीने पंतप्रधानांची भेट घेतली

July 25th, 07:56 pm

पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांना सरकारी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आतापर्यंत आलेल्या अनुभवांविषयी चौकशी केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ग्रामभेटी, भारत दर्शन आणि सशस्त्र दलांच्या भेटींसह प्रशिक्षणाच्या काळात मिळालेल्या शिकवणीबद्दल माहिती दिली. गावागावांमध्ये सरकारने सुरु केलेल्या, जल जीवन अभियान तसेच पंतप्रधान आवास योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या परिवर्तनशील प्रभावाबाबत देखील त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

जी20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी दृक् श्राव्य माध्यमातून दिलेला संदेश

July 22nd, 10:00 am

आपली भिन्न वास्तविकता लक्षात घेता, आपले ऊर्जा संक्रमणाचे मार्ग भिन्न आहेत. मात्र, आमची उद्दिष्टे एकच आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारत खूप प्रयत्न करत आहे. भारत हे सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. तरीही, आम्ही आमच्या हवामान बदल विषयक वचनबद्धतेवर जोरकसपणे पुढे जात आहोत. भारताने हवामान बदला संदर्भात नेतृत्वाची भूमिका घेतली आहे. आम्ही आमचे गैर-जीवाश्म विद्युत क्षमता लक्ष्य नऊ वर्षे अगोदरच गाठले आहे. आम्ही आता उच्च लक्ष्य निश्चित केले आहे. 2030 पर्यंत 50 टक्के गैर-जीवाश्म क्षमता गाठण्याची आमची योजना आहे. सौर आणि पवन उर्जा क्षेत्रात भारत जगात नेतृत्व करत आहे. मला आनंद आहे की कार्यगटाच्या प्रतिनिधींनी पावागड सोलर पार्क आणि मोढेरा सोलर व्हिलेजला भेट दिली. त्यांनी स्वच्छ ऊर्जेसाठीची भारताची वचनबद्धता आणि प्रमाण पाहिले आहे.

जी 20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

July 22nd, 09:48 am

जरी प्रत्येक राष्ट्राची प्रत्यक्ष स्थिती आणि ऊर्जा संक्रमणाचा मार्ग भिन्न असला तरीही, प्रत्येक देशाची उद्दिष्टे समान आहेत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत हे सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि तरीही ते आपल्या हवामान संबंधित वचनबद्धतेच्या दिशेने ताकदीने वाटचाल करत आहे, याकडे पंतप्रधानांनी हरित विकास आणि ऊर्जा संक्रमणातील भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत लक्ष वेधले. भारताने आपले गैर-जीवाश्म स्थापित विद्युत क्षमतेचे उद्दिष्ट नऊ वर्षे अगोदरच गाठले आहे आणि स्वतःसाठी उच्च उद्दिष्ट निर्धारित केले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. 2030 पर्यंत 50 टक्के गैर-जीवाश्म स्थापित क्षमता गाठण्याची राष्ट्राची योजना आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. “सौर आणि पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत देखील जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या आघाडीच्या राष्ट्रांमध्ये आहे”,असे सांगत कार्यगटाच्या प्रतिनिधींना पावागड सौर पार्क आणि मोढेरा सौरग्रामला भेट देऊन स्वच्छ ऊर्जेसाठी भारताच्या वचनबद्धतेची उंची आणि व्याप्ती पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सीओपी 28 (CoP28) शिखर संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष डॉ. सुलतान अल जाबेर यांची भेट घेतली

July 15th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2023 रोजी अबू धाबी येथे सीओपी 28 (CoP28) शिखर संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलतान अल जाबेर यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला केलेले संबोधन

June 23rd, 07:17 am

अमेरीकी कॉंग्रेसला संबोधित करणे हा नेहमीच मोठा सन्मान असतो. असे दोनदा करणे हा एक अपवादात्मक सन्मान आहे. या सन्मानासाठी मी भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीने मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मला दिसतेय की तुमच्यापैकी जवळपास निम्मे 2016 मध्ये इथे होता. जुने मित्र म्हणून तुमची आपुलकी मला जाणवतेय. मी अर्ध्या भागात नव्यांमधील मैत्रीचा उत्साह देखील पाहू शकतो. मला आठवते की सिनेटर हॅरी रीड, सिनेटर जॉन मॅककेन, सिनेटर ऑरिन हॅच, एलिजा कमिंग्ज, अॅल्सी हेस्टिंग्ज आणि इतर, ज्यांना मी येथे 2016 मध्ये भेटलो होतो आणि काही जे दुर्दैवाने आता आपल्यासोबत नाहीत.

अमेरिकी संसदेच्या संयुक्त बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

June 23rd, 07:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जून 2023 रोजी, अमेरिकी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. अमेरिकी प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅकार्थी, सिनेटचे बहुमतातले नेते चार्ल्स शुमर, सिनेटचे रिपब्लिकन पक्षाचे नेते मिच मॅकॉनेल, आणि सिनेटचे डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते हकीम जेफ्रीस, या मान्यवरांनी त्यांना या भाषणासाठी निमंत्रीत केले होते.

मैसुरू इथल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांचे संबोधन

April 09th, 01:00 pm

केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री भूपेंद्र यादव जी, श्री अश्विनी कुमार चौबे जी, इतर देशांमधून आलेले मंत्रीगण, राज्यांचे मंत्री, इतर प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधानांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे ‘प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्षपूर्ती’निमित्त आयोजित कार्यक्रमाचे केले उद्घाटन

April 09th, 12:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर विद्यापीठात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या 50 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) म्हणजेच, मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य या मोहिमेचा देखील प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विविध साहित्य प्रकाशित केले. ‘अमृत काल का व्हिजन फॉर टायगर कॉन्झर्वेशन’ हे पुस्तक तसेच व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या पाचव्या फेरीचा सारांश अहवाल आणि अखिल भारतीय व्याघ्र अंदाज (पाचवी फेरी)चा सारांश अहवाल प्रसिद्ध केला. यासोबतच त्यांनी भारतातील वाघांची संख्या घोषित केली. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी एक विशेष नाणेही जारी केले.

नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 18th, 02:43 pm

आजच्या या परिषदेत उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र तोमरजी, मनसुख मांडवीयाजी, पियुष गोयलजी, कैलास चौधरीजी! विदेशातून आलेले काही मंत्रीगण, गयाना, मालदीव, मॉरिशस श्रीलंका, सुदान, सूरिनाम आणि गाम्बियाचे सर्व माननीय मंत्रीगण, जगातील वेगवेगळ्या भागातून शेती पोषण आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक आणि तज्ञ, वेगवेगळे आणि FPO’s आणि Starts-Ups मधील युवा मित्र देशातील कानाकोपऱ्यातून इथे जोडले गेलेले लाखो शेतकरी, इतर मान्यवर आणि आपणं सर्वजण.

पंतप्रधानांनी केले जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेचे उद्घाटन

March 18th, 11:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक भरडधान्य श्री अन्न परिषदेचे उद्घाटन केले. नवी दिल्लीत पुसा येथे सुब्रमण्यम हॉल, एन ए एस सी कॉम्प्लेक्स, आय ए आर आय कॅम्पस येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे केलेले भाषण

February 12th, 11:00 am

कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष सुरेशचंद्र आर्य जी, दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष धर्मपाल आर्य, विनय आर्य, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, किशन रेड्डी, मीनाक्षी लेखी, अर्जुन राम मेघवाल, सर्व प्रतिनिधीमंडळी उपस्थित बंधू आणि भगिनी! म्हर्षी दयानंद जी, यांच्या 200 व्या जयंतीचा हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे आणि भविष्यात इतिहास निर्माण करणारी संधीही आहे. या संपूर्ण विश्वासाठी , मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीने प्रेरणा देणारा क्षण आहे. स्वामी दयानंद आणि त्यांचे आदर्श होते - ‘‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’’।। याचा अर्थ आहे, आपण संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ बनवायचे आहे. आपण संपूर्ण विश्वामध्ये श्रेष्ठ विचारांना, मानवीय आदर्शांना स्थापित करायचे आहे.

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंती सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे उदघाटन

February 12th, 10:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी स्वामिजींच्या स्मरणार्थ एक लोगोही प्रकाशित केला.

व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटच्या नेते सत्र समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारोपाचे भाषण

January 13th, 06:37 pm

तुमच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल धन्यवाद! हे खरोखरच विचार आणि कल्पनांचे उपयुक्त आदान-प्रदान ठरले आहे. यातून ग्लोबल साउथच्या सामायिक आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या.

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण

November 08th, 07:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.

एकता नगर, गुजरात इथे झालेल्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

September 23rd, 04:26 pm

आपणा सर्वांचे या राष्ट्रीय परिषदेत आणि विशेषतः एकता नगरमध्ये आपले स्वागत आहे, अभिनंदन आहे. एकता नगर मध्ये ही राष्ट्रीय परिषद होत आहे, हे मला अतिशय महत्वपूर्ण वाटते. आपण जंगलांबद्दल बोललो तर, आपल्या आदिवासी बंधू - भगिनींविषयी बोलायचं, वन्यजीवांविषयी बोलायचं, जल संवर्धनावर चर्चा, पर्यटनावर चर्चा केली, आपण निसर्ग आणि पर्यावरण आणि विकास, एकप्रकारे एकता नगरचा जो सर्वांगीण विकास झाला आहे, तो हा संदेश देतो, विश्वास निर्माण करतो की वन आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आज एकता नगर एक तीर्थक्षेत्र बनले आहे. आपण याच क्षेत्राशी संबंधित अधिकारी आला आहात. माझी इच्छा आहे एकता नगरमध्ये आपण जितका काळ घालवाल, त्या लहान लहान गोष्टींच जरूर निरीक्षण करा, ज्यात पर्यावरणाविषयी, आपल्या आदिवासी समाजाविषयी, आपल्या वन्य जीवांविषयी, किती संवेदनशील राहून काम केले आहे, सगळी रचना केली आहे, निर्माण कार्य झाले आहे आणि भविष्यात देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात वन पर्यावरणाचे रक्षण करत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाता येते, हे आणि खूप काही इथे बघायला - शिकायला मिळेल.