भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.