G20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाट इथे महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली

September 10th, 12:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी भूषविले 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद

September 09th, 09:21 pm

यावर्षी भारताच्या अध्यक्षते दरम्यान ब्रिक्स भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ज्यामुळे अनेक नवीन उपक्रम साध्य झाले.यात पहिली ब्रिक्स डिजिटल आरोग्य शिखर परिषद; बहुपक्षीय सुधारणांवरील पहिले ब्रिक्स मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन; ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती आराखडा ; रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या क्षेत्रातील सहकार्यावरील करार; आभासी ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र; हरित पर्यटनाबाबतची ब्रिक्स आघाडी इत्यादींचा यात समावेश आहे.

13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

September 09th, 05:43 pm

या ब्रिक्स शिखर परिषदेत मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. ब्रिक्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणे ही माझ्यासाठी आणि भारतासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्यासोबत होत असलेल्या या शिखर परिषदेचा तपशीलवार अजेंडा आपल्याकडे आहे. जर तुम्ही सर्व सहमत असाल तर आपण हा अजेंडा स्वीकारू शकतो. धन्यवाद, अजेंडा आता स्वीकारला गेला आहे.

13 वी ब्रिक्स शिखर परिषद

September 07th, 09:11 am

2021 मध्ये ब्रिक्सच्या भारताच्या अध्यक्षतेचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या आभासी स्वरूपातील (व्हर्च्युअल) 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष असतील. या बैठकीला ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मारकोस ट्रोयजो, ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे अस्थायी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी शिखर परिषदे दरम्यान नेत्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित त्याअंतर्गत या वर्षी पाठविलेल्या निकालांचे अहवाल सादर करतील.

पंतप्रधानांनी कल्याण सिंह यांच्या निधनाप्रसंगी प्रसारमाध्यमांपुढे केलेले निवेदन

August 22nd, 11:42 am

आपल्या सर्वांसाठी हा एक दु:खदायक क्षण आहे. कल्याण सिंह जी यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव कल्याण सिंह असे ठेवले होते. त्यांनी अशा प्रकारे आपले जीवन व्यतीत केले, की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या ठेवलेल्या नावाचे त्यांनी सार्थक केले. ते आयुष्यभर लोकांच्या कल्याणासाठी जगले, त्यांनी लोककल्याणाला आपला जीवन-मंत्र बनविला. आणि त्यांनी आपले जीवन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनसंघ, हे एक संपूर्ण कुटुंबच आहे, अशा एका विचारासाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समर्पित केले.

IPS Probationers interact with PM Modi

July 31st, 11:02 am

PM Narendra Modi had a lively interaction with the Probationers of Indian Police Service. The interaction with the Officer Trainees had a spontaneous air and the Prime Minister went beyond the official aspects of the Service to discuss the aspirations and dreams of the new generation of police officers.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन

July 31st, 11:01 am

आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला

July 31st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.

जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय पक्षांबरोबर मा.पंतप्रधानांच्या नेतृत्वात बैठक झाल्यानंतर राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी केलेल्या निवेदनाचा मराठी अनुवाद

June 24th, 11:53 pm

जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय पक्षांबरोबर मा.पंतप्रधानांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेचा नुकताच समारोप झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाहीचे बळकटीकरण आणि विकास होण्याच्या दिशेने हा अतिशय सकारात्मक प्रयत्न आहे. अतिशय खेळीमेळीच्या व स्नेहपूर्ण वातावरणात ही बैठक संपन्न झाली. भारताच्या लोकशाहीप्रती आणि भारताच्या संविधानाप्रती सर्वच पक्षांनी पूर्ण निष्ठा आणि पाठिंबा व्यक्त केला.

जम्मू आणि काश्मीरविषयीची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होय : पंतप्रधान

June 24th, 08:52 pm

“जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवली आहे.

दिल्लीत करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 28th, 12:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी म्हणजेच राष्टीय छात्र सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तीनही सशस्त्र सेवांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी एनसीसीच्या पथकांच्या संचलनाचे निरीक्षण केले. या पथकांनी पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली. याप्रसंगी छात्रांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावरील एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

January 28th, 12:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी म्हणजेच राष्टीय छात्र सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तीनही सशस्त्र सेवांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी एनसीसीच्या पथकांच्या संचलनाचे निरीक्षण केले. या पथकांनी पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली. याप्रसंगी छात्रांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकाता इथे आयोजित पराक्रम दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

January 23rd, 08:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोलकाता येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीला उपस्थित राहिले. कोलकाता येथील विक्टोरिया मेमोरियल येथील पराक्रम दिवस समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नेताजींवरील कायमस्वरूपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंगचे उद्घाटन यावेळी झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते संस्मरण नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण झाले. अमरा नूतन जोबोनेरी दूत '' हा नेताजीं च्या जीवन आणि कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाला. “Re-visiting the legacy of Netaji Subhas in the 21st century”

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकाता इथे आयोजित कार्क्रमाला पंतप्रधान उपस्थित

January 23rd, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोलकाता येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीला उपस्थित राहिले. कोलकाता येथील विक्टोरिया मेमोरियल येथील पराक्रम दिवस समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नेताजींवरील कायमस्वरूपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंगचे उद्घाटन यावेळी झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते संस्मरण नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण झाले. अमरा नूतन जोबोनेरी दूत '' हा नेताजीं च्या जीवन आणि कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाला. “Re-visiting the legacy of Netaji Subhas in the 21st century”

दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 12th, 10:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोपाला पंतप्रधानांनी केले संबोधित

January 12th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

October 25th, 11:00 am

मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.

राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांच्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 12th, 11:01 am

केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकरी, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजमाता विजयाराजे सिंधिया यांचे देश-विदेशातील चाहते आणि कुटुंबातील सदस्य, त्यांचे स्नेही आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी

October 12th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.

लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव गारु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक

September 16th, 11:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव गारु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.