ओडिशा पर्ब कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 24th, 08:48 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री धर्मेंद्र प्रधान जी, श्री अश्विनी वैष्णव जी, ओडिया समाजाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ प्रधान जी, ओडिया समाजाचे इतर अधिकारी, ओदिशातील सर्व कलाकार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ओदिशा पर्व 2024’ सोहळ्यात झाले सहभागी
November 24th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित ‘ओदिशा पर्व 2024’ सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ओदिशातील सर्व बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावर्षी स्वभाव कवी गंगाधर मेहेर यांच्या पुण्यतिथीचे शताब्दी वर्ष आहे असे सांगत त्यांनी मेहेर यांना आदरांजली वाहिली . यावेळी त्यांनी भक्त दासिया भौरी , भक्त सालबेगा आणि उडिया भागवतचे लेखक जगन्नाथ दास यांना श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधानांनी घेतली परमपूज्य बाभुळगावकर महाराजांची भेट
November 14th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उदात्त विचार आणि लिखाणासाठी आदरणीय असलेल्या परमपूज्य बाभुळगावकर महाराज यांची भेट घेतली.मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
October 03rd, 09:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यासमवेत अगालेगा बेटांवर हवाईपट्टी आणि जेटीच्या संयुक्त उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मजकूर
February 29th, 01:15 pm
महामहीम पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मॉरिशसच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित सदस्य, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर, अगालेगा येथील रहिवासी आणि आजच्या या कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी,पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते मॉरिशसमधील अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि जेट्टीचे संयुक्तपणे उद्घाटन
February 29th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मॉरिशसच्या अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टी यांसह अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांचे उद्घाटन हा भारत आणि मॉरिशस या दोन देशांमधील भक्कम आणि अनेक दशके जुन्या विकासात्मक भागीदारीचा दाखला आहे. हे प्रकल्प मॉरिशसची मुख्य भूमी आणि अगलेगाबेट यांच्या दरम्यान अधिक चांगल्या वाहतुकीद्वारे संपर्क सुविधेची मागणी पूर्ण करेल, या भागातील सागरी सुरक्षा बळकट करेल आणि येथील सामाजिक आर्थिक विकासाला चालना देईल. नुकतेच 12 फेब्रुवारी 2024 ला या दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये युपीआय आणि रूपे कार्ड या सेवांची सुरुवात केली होती, त्यापाठोपाठ आज झालेले प्रकल्पांचे हे उद्घाटन महत्त्वपूर्ण आहे.मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन
February 25th, 11:00 am
नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संग्रहित कार्याच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 25th, 04:31 pm
मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अनुराग ठाकूर जी, अर्जुन राम मेघवाल जी, महामना संपूर्ण वाङ्ग्मयाचे मुख्य संपादक माझे खूप जुने मित्र रामबहादुर राय जी, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष प्रभुनारायण श्रीवास्तव जी, मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ सहयोगी, बंधू आणि भगिनींनो,पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य' चे प्रकाशन
December 25th, 04:30 pm
महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य ' च्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचं प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पांजली वाहिली. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींमत्वांमध्ये त्यांनी आघाडीचं स्थान प्राप्त केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट विद्वान आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले मदन मोहन मालवीय यांचं जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केलं जाते.मध्यप्रदेशात चित्रकूट इथे झालेल्या तुळसीपीठ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 03:55 pm
सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी, इथे आलेली सर्व तपस्वी ज्येष्ठ संत मंडळी, ऋषी मंडळी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी, उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुष हो!PM addresses programme at Tulsi Peeth in Chitrakoot, Madhya Pradesh
October 27th, 03:53 pm
PM Modi visited Tulsi Peeth in Chitrakoot and performed pooja and darshan at Kanch Mandir. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for performing puja and darshan of Shri Ram in multiple shrines and being blessed by saints, especially Jagadguru Rambhadracharya. He also mentioned releasing the three books namely ‘Ashtadhyayi Bhashya’, ‘Rambhadracharya Charitam’ and ‘Bhagwan Shri Krishna ki Rashtraleela’ and said that it will further strengthen the knowledge traditions of India. “I consider these books as a form of Jagadguru’s blessings”, he emphasized.सरकारी विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 51000+ जणांच्या नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
August 28th, 11:20 am
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, देशाचे स्वातंतत्र्याचे आणि देशातील कोटि-कोटि नागरिकांचे अमृत-रक्षक झाल्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. मी तुम्हाला अमृतरक्षक यासाठी म्हटले, कारण आज ज्या तरुणांना नियुक्तीपत्र मिळत आहेत, ते देशाच्या सेवे सोबतच देशाचे नागरिक आणि देशाचेही रक्षण करतील. म्हणून तुम्ही एकाप्रकारे या अमृतकाळाचे जन (नागरीक) आणि अमृत-रक्षक देखील आहात.रोजगार मेळ्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रं प्रदान
August 28th, 10:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान केली. देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्या द्वारे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सी आर पी एफ), सीमा सुरक्षा दल (बी एस एफ), सशस्त्र सीमा दल (एस एस बी), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी आय एस एफ), भारत तिबेट सीमा पोलीस दल (आय टी बी पी) आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन सी बी) तसेच दिल्ली पोलीस अशा विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सी ए पी एफ), केंद्रीय गृहमंत्रालय भर्ती करत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी, गृह मंत्रालयाच्या विविध संस्थांमध्ये, हवालदार (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि बिगर जनरल ड्युटी श्रेणीतील पदे, अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.G-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
June 22nd, 11:00 am
G-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी मी आपणा सर्वांचे भारतात स्वागत करतो. शिक्षण हा केवळ आपल्या संस्कृतीचा पाया नाही तर मानवतेच्या भवितव्याचा शिल्पकारही आहे. सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीसाठीच्या आमच्या प्रयत्नांमध्ये, शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही सर्वजण, मानव जातीचे नेतृत्व करणारे शेर्पा आहात. भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘आनंद देते ते शिक्षण’ अशी शिक्षणाची भूमिका विषद केली आहे.जी-20 शिक्षण कार्य गटाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन
June 22nd, 10:36 am
शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, सभ्यतेचा पायाच उभा नाही, तर आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय शास्त्रानुसार, शिक्षणाची भूमिका जीवनात आनंदाची दारे करणारी गुरुकिल्ली अशी केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपले मूल्य ठरते, आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.” भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘अर्थ समजून वाचन करणे तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ‘निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनी देखील, ‘पायाभूत साक्षरता आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या विषयावर कालबद्धरित्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण संघाच्या अधिवेशनातील पंतप्रधानांचे भाषण
May 12th, 10:31 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जे आयुष्यभर स्वतःचा परिचय, शिक्षक असा करुन देत आहेत, असे परुषोत्तम रुपाला जी, गेल्या निवडणुकीत, भारताच्या संसदेत, देशात, संपूर्ण देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले श्रीमान सी आर पाटील जी, गुजरात सरकारचे मंत्री, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सन्माननीय शिक्षक, बंधू आणि भगिनींनो!गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात पंतप्रधान सहभागी
May 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात सहभागी झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची ही 29 वी द्विवार्षिक परिषद आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. ‘शिक्षणातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'शिक्षक ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी( CAPF) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठीच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाची पंतप्रधानांकडून प्रशंसा
April 15th, 03:40 pm
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी( CAPF) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठीच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये देखील घेण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय परिवर्तनात्मक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.तामिळ नववर्ष समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 13th, 08:21 pm
आपल्या सर्वांना तामिळ पुथांडू निमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं प्रेम, माझ्या तमिळ बंधू-भगिनींच्या स्नेहामुळेच आज मला आपल्या बरोबर तामिळ पुथांडू साजरा करण्याची संधी मिळाली आहे. पुथांडू म्हणजे पुरातन काळातील नवोन्मेषाचा सण! तामिळ संस्कृती एवढी प्राचीन आहे, आणि दर वर्षी पुथांडू मधून नवीन ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करण्याची ही परंपरा खरोखरच अद्भुत आहे! हीच गोष्ट तामिळनाडू आणि तामिळ लोकांचं वेगळेपण आहे. म्हणून मला नेहमीच या परंपरेचं आकर्षण वाटत आलं आहे आणि तिच्याशी मी भावनिक रित्या जोडला गेलो आहे. मी गुजरातमध्ये असताना, ज्या मणीनगर विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार होतो, तिथे मोठ्या संख्येने मूळचे तामिळनाडू इथले नागरिक राहत होते, ते माझे मतदार होते, ते मला आमदारही बनवायचे आणि मुख्यमंत्रीही बनवायचे. त्यांच्या बरोबर व्यतीत केलेले क्षण मला नेहमी आठवतात. माझं हे भाग्य आहे, की मी तामीळनाडूला जेवढं प्रेम दिलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम मला तामिळ जनतेने नेहमीच परत दिलं.