Swachhata is a lifelong commitment: PM Modi
October 02nd, 04:45 pm
On Gandhi Jayanti, Prime Minister Narendra Modi joined the nation's youth in the Swachhta Abhiyan, encouraging citizens to engage in cleanliness activities and reinforce the Swachh Bharat Mission.स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत स्वच्छता मोहिमेत झाले सहभागी
October 02nd, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत लहान शाळकरी मुलांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
October 02nd, 09:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावर पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 02nd, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय घाट येथे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 02nd, 08:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे.21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी
May 28th, 11:30 am
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री यांना संसद भवनात वाहिली श्रद्धांजली
October 02nd, 05:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त आज संसद भवनात पुष्पांजली वाहिली.दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांनी विजय घाटावर जाऊन केले पुष्पचक्र अर्पण
October 02nd, 10:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी विजय घाट येथे जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती दिनी आदरांजली
October 02nd, 09:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच पंतप्रधानांनी शास्त्री यांच्या विचारांवरील एक व्हिडिओ चित्रफीतही सामायिक केली. मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातील शास्त्री यांचा जीवनप्रवास आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या कामगिरी दर्शवणारी छायाचित्रेही सामायिक केली आहेत.बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
August 13th, 11:31 am
सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार
August 13th, 11:30 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.छोट्या रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांमुळे मोठ्या डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 24th, 11:30 am
मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.भारताच्या विकास गाथेचा हाच टर्निंग पॉईंटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 28th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.पंतप्रधानांनी लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी वाहिली आदरांजली
October 02nd, 10:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे.छोट्या प्रयत्नांतूनच मोठे बदल घडतातः पंतप्रधान मोदी
September 26th, 11:30 am
आता अशी परंपरा तर नाही राहिली पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरात जरी स्नान करत असलो तरी नद्यांचे स्मरण करण्याची परंपरा, भलेही आज लुप्त झाली असेल किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात, उरली असेल. पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच विशाल भारताची एक यात्रा घडवत असे, मानसिक यात्रा!‘वैभव 2020” शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी यांचे भाषण
October 02nd, 06:21 pm
“आज अधिकाधिक युवकांचा विज्ञानाकडे कल वाढावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला इतिहासातील विज्ञानाची आणि विज्ञानाच्या इतिहासाची अशी दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘वैश्विक भारतीय वैज्ञानिक-म्हणजेच वैभव या आंतरराष्ट्रीय आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगभरातील भारतीय संशोधक आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले होते.PM remembers Lal Bahadur Shastri on his Jayanti
October 02nd, 09:37 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has remembered former Prime Minister Lal Bahadur Shastri on his Jayanti.महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी आदरांजली अर्पण केली.