पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल केले अभिनंदन

August 26th, 12:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल अभिनंदन केले आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

लडाखच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

August 19th, 05:48 pm

लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर डॉक्टर बी. डी. मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

कलम 370 आणि 35 (अ) रद्द केल्याला 5 वर्षे पूर्ण झाल्याची पंतप्रधानांकडून दखल

August 05th, 03:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कलम 370 आणि 35(अ) रद्द करण्याच्या संसदेच्या 5 वर्षे जुन्या निर्णयाचे स्मरण केले आणि हा अविस्मरणीय क्षण असल्याचा उल्लेख करून याद्वारे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख मध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची नांदी झाल्याचे नमूद केले.

कारगिल विजय दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील द्रास येथे केलेले भाषण

July 26th, 09:30 am

लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा, केंद्रीय मंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दल प्रमुख, कारगिल युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख पदावर असलेले जनरल व्ही पी मलिक, माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, सेवेमधील आणि सेवानिवृत्त शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिक, कारगिल युद्धातील वीर योद्ध्यांच्या माता, वीर नारी आणि त्यांचे कुटुंबीय,

कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधानांनी लडाख येथे आयोजित श्रद्धांजली समारंभात भाग घेतला

July 26th, 09:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आभासी पद्धतीने लडाख येथील शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभी सुरुंगस्फोट पाहिला. शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पादुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा दुहेरी -ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे लेह भागाशी वर्षभरात कोणत्याही मोसमात संपर्क करण्याची कायमची सोय होणार आहे.

25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलै रोजी पंतप्रधान कारगिलला भेट देणार

July 25th, 10:28 am

25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात लावली जाईल.

कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक : पंतप्रधान

December 11th, 12:48 pm

कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि भारताच्या संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 26th, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.

लडाखमधील 13 GW अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी हरित ऊर्जा कॉरिडॉर (GEC) टप्पा-II अंतर्गत, आंतर-राज्य पारेषण प्रणाली (ISTS) प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 18th, 03:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज लडाखमधील 13 GW अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी हरित ऊर्जा कॉरिडॉर (GEC) टप्पा-II अंतर्गत, आंतर-राज्य पारेषण प्रणाली (ISTS) प्रकल्पाला मंजुरी दिली.

लडाखमधील लाकडावर कोरीव काम करण्याच्या पद्धतीला मिळालेल्या जीआय टॅगचे पंतप्रधानांनी केले कौतुक

April 05th, 10:57 am

लडाखचे खासदार जामियाँग त्सेरिंग नामग्याल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर(निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

March 13th, 06:13 pm

लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर(निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

लडाख मधील लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू

February 19th, 10:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख मधील लोकांचे जीवन सुखकर करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सर्व प्रकारच्या हवामानात देशाचा लडाखबरोबर कायम संपर्क रहावा या उद्देशाने 4.1 किमी लांबीच्या शिंकुन ला बोगद्याच्या बांधकामासाठी 1681.51 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल लडाख मधील लोकसभेचे सदस्य जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

November 22nd, 10:31 am

तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

November 22nd, 10:30 am

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

लडाखमधील तुरतुक येथल्या लोकांची स्वच्छ भारतासाठी असलेली इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी यासाठी पंतप्रधानांनी त्यांचे केले कौतुक

October 03rd, 10:33 pm

लडाखमधील तुरतुक येथल्या जनतेचे त्यांची स्वच्छ भारतासाठी असलेली इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

शिमला येथे गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 31st, 11:01 am

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र जी, येथील लोकप्रिय आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री माझे मित्र जयराम ठाकुर जी, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जुने सहकारी सुरेश जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, खासदार , आमदार , हिमाचलचे सर्व लोकप्रतिनिधि. आज माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस देखील आहे आणि त्या विशेष दिवशी या देवभूमीला प्रणाम करण्याची संधी मिळाली यापेक्षा मोठे जीवनाचे सौभाग्‍य काय असू शकते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, मी तुमचे खूप-खूप आभार मानतो.

PM addresses ‘Garib Kalyan Sammelan’ in Shimla

May 31st, 11:00 am

Prime Minister Narendra Modi addressed ‘Garib Kalyan Sammelan’ in Shimla, Himachal Pradesh. The Prime Minister said that the welfare schemes, good governance, and welfare of the poor (Seva Sushasan aur Gareeb Kalyan) have changed the meaning of government for the people. Now the government is working for the people, he added.

PM condoles death of Indian army personnel in bus accident in Ladakh

May 27th, 07:34 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the death of Indian army personnel in a bus accident in Ladakh.

पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या ग्राम सभांशी साधला संवाद

April 24th, 11:31 am

जम्मू-काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंह जी, याच भूमीचे सुपुत्र माझे सहकारी डॉक्टर जितेंद्र सिंह, श्री कपिल मोरेश्वर पाटील जी, संसदेतले माझे सहकारी जुगल किशोर जी, जम्मू काश्मीर सह संपूर्ण देशातून या कार्यक्रमात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-कश्मीर इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी

April 24th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीतून त्यांनी देशभरातील ग्रामसभांना संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. तसेच, ‘अमृत सरोवर’ उपक्रमाचाही त्यांनी शुभारंभ केला. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.