लचित दिनानिमित्त पंतप्रधानांनी लचित बोरफुकन यांच्या शौर्याला केले अभिवादन

November 24th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना अभिवादन केले आहे. मोदी म्हणाले की, आज लचित दिनानिमित्त आपण लचित बोरफुकन यांच्या शौर्याचे स्मरण करतो. सराईघाटच्या लढाईतील त्यांनी केलेले असाधारण नेतृत्व, अशा समरप्रसंगी दाखवलेली तडफ म्हणजे कर्तव्याविषयी निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचा वारसा हा आपल्या इतिहासाला आकार देणार्‍या शौर्याचा आणि मुत्सद्देगिरीचा कालातीत दाखला आहे.

नवी दिल्ली येथे लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चाललेल्या कार्यक्रमांच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 25th, 11:00 am

आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजित, निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई, तपन कुमार गोगोई, आसाम सरकारचे मंत्री पिजूष हजारिका, संसद सदस्य आणि या कार्यक्रमात सहभागी असलेले आणि देश-विदेशातील आसामी संस्कृतीशी संबंधित सर्व मान्यवर.

शूरवीर लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमांचा पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारोप

November 25th, 10:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर सुरु असलेल्या सोहळ्याचा आज नवी दिल्ली येथे समारोप केला. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात ‘लचित बोरफुकन – मुघलांना रोखणारे आसामचे शूरवीर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले.

पंतप्रधान 25 नोव्हेंबर 2022 रोजी लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार

November 24th, 11:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच उद्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत.