PM Modi invites everyone to Rann Utsav
December 21st, 10:08 am
Prime Minister Shri Narendra Modi has invited everyone to Rann Utsav, which will go on till March 2025. Prime Minister Shri Modi underscored that the festival promises to be an unforgettable experience.Our Jawans have proved their mettle on every challenging occasion: PM Modi in Kutch
October 31st, 07:05 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.PM Modi celebrates Diwali with security personnel in Kutch,Gujarat
October 31st, 07:00 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.सरकारचे प्रमुख या नात्याने 23 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली
October 07th, 09:06 pm
सरकारचे प्रमुख या नात्याने 23 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळाचे त्यांनी स्मरण केले आणि ते म्हणाले की त्या काळात समाजाचे सर्व घटक समृद्ध होतील याची सुनिश्चिती करत गुजरात राज्य ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेचे झळाळते उदाहरण म्हणून उदयाला आले. गेल्या दशकातील देशाच्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारताच्या विकासात्मक प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाकडे अतिशय आशेने पाहिले जाईल याची सुनिश्चिती झाली आहे. आपण देशहितासाठी अथकपणे काम करत राहणार असून विकसित भारताचे सामुहिक उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्मृतीवनला स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
June 15th, 06:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कच्छ मधील शांतीवनाच्या प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीतील समावेशाचे स्वागत केले आहे. 2001 साली कच्छ येथील विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.Congress's mindset is against the rural development of border villages: PM Modi in Barmer
April 12th, 02:30 pm
Ahead of the upcoming Lok Sabha elections, PM Modi was accorded a bustling welcome by Barmer as he addressed an election rally in Rajasthan. He said, Rajasthan represents valour and courage along with a resolve to enable a 'Viksit Bharat.' He added that looking at the popular support, the people are determined for '4 June 400 Paar, Fir ek Baar Modi Sarkar.'Barmer's bustling welcome for PM Modi as he addresses an election rally in Rajasthan
April 12th, 02:15 pm
Ahead of the upcoming Lok Sabha elections, PM Modi was accorded a bustling welcome by Barmer as he addressed an election rally in Rajasthan. He said, Rajasthan represents valour and courage along with a resolve to enable a 'Viksit Bharat.' He added that looking at the popular support, the people are determined for '4 June 400 Paar, Fir ek Baar Modi Sarkar.'आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
January 13th, 12:00 pm
वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित
January 13th, 11:30 am
तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.”Narendra Modi: The Go-To Man in Times of Crises
November 29th, 09:56 pm
“I salute the determination of all those involved in this rescue campaign. Their courage and resolve have given a new life to our fellow workers. Everyone involved in this mission has set a remarkable example of humanity and teamwork,” PM Modi said in a telephonic conversation with the rescued workers who were successfully pulled out of a collapsed tunnel in Uttarakhand.गुजरातमधल्या मेहसाणा इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 30th, 09:11 pm
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेन्द्र भाई, इतर मंत्री वर्ग, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात भाजपाचे अध्यक्ष भाई सी.आर.पाटील, इतर खासदार आणि आमदार वर्ग,तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने येथे आलेले माझे प्रिय गुजरातचे कुटुंबीय,गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी
October 30th, 04:06 pm
गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.युएनडब्ल्यूटीओतर्फे सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातमधील धोर्डो गावाची केली प्रशंसा
October 20th, 03:34 pm
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोर्डो गावाला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (युएनडब्ल्यूटीओ) सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्रामाचा किताब जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोर्डो गावाची प्रशंसा केली आहे.आकांक्षित जिल्ह्यांशी संबंधित संकल्प सप्ताह या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 30th, 10:31 am
या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सर्व सहकारी, सरकार मधील अधिकारी वर्ग, निती आयोगाचे सर्व मित्र आणि या कार्यक्रमांमध्ये देशातल्या वेगवेगळ्या भागांमधून, वेगवेगळ्या ब्लॉकमधून तळागाळातील जे लाखो मित्र जोडले गेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सहभागी लोकप्रतिनिधी सुद्धा आज या कार्यक्रमात कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत आणि या विषयांमध्ये रुची असणारे पण आज आपल्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमांमधून जोडले गेले आहेत, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.देशातील आकांक्षी तालुक्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला, ‘संकल्प सप्ताह’ हा साप्ताहिक कार्यक्रम
September 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे देशातल्या तालुक्यांच्या विकासासाठी एका विशेष ‘संकल्प सप्ताह’ या साप्ताहिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याशिवाय, पंतप्रधानांनी आकांक्षी तालुक्यांसाठीच्या कार्यक्रम पोर्टलचीही सुरुवात केली आणि या निमित्त आयोजित प्रदर्शनाचेही उद्घाटन केले.पंतप्रधानांनी स्मृती वन उद्घाटन दिवसाच्या आठवणींना दिला उजाळा
August 29th, 08:32 pm
2001 च्या गुजरात भूकंपात प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून उभारण्यात आलेल्या स्मृती वन उद्घाटन दिवसाच्या आठवणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 18th, 11:30 am
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांच्या सज्जतेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
June 12th, 04:23 pm
देशातील समुद्रकिनारी धडकण्याची भीती असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळामुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच गुजरात राज्य सरकारची मंत्रालये तसेच सरकारी संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.2001 मधील प्राणघातक भूकंपानंतर कच्छचा झालेला कायापालट दाखवणारी ट्वीट ची साखळी पंतप्रधानांनी सामाईक केली
April 05th, 10:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छचे खासदार विनोद चावडा यांनी केलेले ट्विट शेअर केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की 2001 मधील भूकंपाच्या विध्वंसानंतर पर्यटनाचे एक उत्तम ठिकाण म्हणून कच्छचा कायापालट आणि विकास झाला आहे.अहमदाबाद इथे प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 14th, 05:45 pm
परम पूज्य महंत स्वामी जी, पूज्य संत गण, राज्यपाल श्री आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल जी,आणि उपस्थित सर्व सत्संग परिवार, माझं हे भाग्य आहे, की मला या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार बनण्याचे आणि सत्संगी बनण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. इतक्या मोठ्या स्तरावर आणि एक महिनाभर चालणारा हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम केवळ संख्येच्या बळावर मोठा आहे किंवा कालावधी खूप जास्त आहे, म्हणून मोठा आहे असे नव्हे . तर ,जेवढा वेळ मी इथे घालवला, त्यावरून मला असं जाणवलं की ही दिव्यत्वाची अनुभूती आहे. इथे संकल्पांची भव्यता आहे. इथे आबालवृद्धांसाठी आपला वारसा काय आहे, आपली परंपरा काय आहे, श्रद्धा काय आहेत, आपले अध्यात्म काय आहे, संस्कृती काय आहे, आपला स्वभावधर्म काय आहे, या सगळ्या गोष्टी या परिवाराने सांभाळून ठेवल्या आहेत, त्यांचे जतन करत आहेत. इथे भारताचा प्रत्येक रंग आपल्याला दिसतो. मी या प्रसंगी, सर्व पूज्य संत गण यांना या आयोजनामागच्या कल्पनाशक्तिसाठी, आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले आहेत, त्यासाठी मी त्या सर्वांना वंदन करतो. मनापासून त्यांचे आभार मानतो. पूज्य महंत स्वामीजी यांच्या आशीर्वादाने इतके मोठे भव्य आयोजन देश आणि जगाला केवळ आकर्षित करणार नाही, तर प्रभावितही करेल, येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देईल.