जागतिक शांततेसाठी आयोजित कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनातील पंतप्रधानांचे भाषण
February 03rd, 07:48 pm
कृष्णगुरु सेवाश्रमात जमलेल्या सर्व संत-ऋषीजनांना आणि भक्तांना माझे विनम्र अभिवादन. कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाचा हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. मला आनंद आहे की कृष्णगुरुजींनी पुढे नेलेली ज्ञान, सेवा आणि मानवतेची प्राचीन भारतीय परंपरा आजही अखंडपणे गतीमान आहे. गुरुकृष्ण प्रेमानंद प्रभूजींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने तसेच कृष्णगुरुंच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे या कार्यक्रमात ती दिव्यता स्पष्टपणे दिसून येते. या निमित्ताने आसाममध्ये येऊन तुम्हा सर्वांसह या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा होती! कृष्णगुरुजींच्या पवित्र तपोभूमीत येण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण कदाचित माझ्या प्रयत्नातच काही कमतरता होती की इच्छा असूनही मी आत्तापर्यंत तिथे येऊ शकलो नाही. कृष्णगुरुंच्या आशीर्वादाने मला येणाऱ्या काळात तिथे येऊन तुम्हा सर्वांना नमन करण्याची, तुमचे दर्शन घेण्याची संधी मिळावी अशी माझी मनोकामना आहे.जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 03rd, 04:14 pm
आसाममधील बारपेटा येथील कृष्णगुरु सेवाश्रम येथे आयोजित जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन हे महिनाभर चालणारे कीर्तन 6 जानेवारीपासून कृष्णगुरु सेवाश्रम इथे आयोजित करण्यात आले आहे.जागतिक शांततेसाठी 3 फेब्रुवारी रोजी आयोजित कृष्णगुरु एकनाम आखाडा कीर्तनात पंतप्रधान होणार सहभागी
February 01st, 10:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारपेटा, आसाम येथे जागतिक शांततेसाठी 3 फेब्रुवारी रोजी आयोजित कृष्णगुरु एकनाम आखाडा कीर्तनात संध्याकाळी 4:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान कृष्णगुरु सेवाश्रमाच्या भाविकांना याप्रसंगी संबोधित करणार आहेत.