2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध आहे: पंतप्रधान मोदी
March 17th, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पुसा परिसरांत आयएआरआय मेळा मैदानावर आयोजित कृषी उन्नत मेळाव्याला भेट दिली. त्यांनी संकल्पना कक्षाला आणि जैविक मेला कुंभाला भेट दिली. त्यांनी 25 कृषी विज्ञान केंद्रांची पायाभरणी केली. त्यांनी जैविक उत्पादनांच्या ई-मार्केटिंग पोर्टलचा शुभारंभ केला. त्यांनी कृषी कर्मण पुरस्कार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले.पंतप्रधानांनी कृषी उन्नती मेळ्याला संबोधित केले
March 17th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुसा संकुलातील आय.ए.आर.आय. मेळा मैदानात कृषी उन्नती मेळ्याला भेट दिली. त्यांनी थीम पॅव्हेलियन आणि जैविक मेळा कुंभाला भेट दिली.पंतप्रधान मोदी 17 मार्च रोजी ‘कृषी उन्नती मेळ्याला’ करणार संबोधित
March 16th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मार्च रोजी नवी दिल्लीतल्या आयएआरआय पुसा मधल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेत वार्षिक ‘कृषी उन्नती मेळ्याला’ संबोधित करतील. यावेळी ते शेतकऱ्यांना संबोधित करतील, तसेच 25 कृषी विज्ञान केंद्रांचा शिलान्यासही करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कृषी कर्मन’ तसेच ‘दिन दयाळ उपाध्याय कृषी विज्ञान प्रोत्साहन’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येईल.