श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 07:00 pm
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित
June 20th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.पंतप्रधान 18 आणि 19 जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारला भेट देणार
June 17th, 09:52 am
19 जून रोजी सकाळी 9.45 वाजता पंतप्रधान नालंदाच्या अवशेषांना भेट देतील. सकाळी 10.30 वाजता, पंतप्रधान बिहारमधील राजगीर इथल्या नालंदा विद्यापीठाच्या इमारत परिसराचे उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.