Our Government has always given priority towards welfare of farmers: PM Modi
January 02nd, 03:40 pm
PM Modi conferred Krishi Karman Awards and addressed a public meeting in Tumakuru, Karnataka today. He also released the 3rd installment of PM-KISAN of Rs 2000 for the period December 2019 - March 2020, which will benefit several farmers.पंतप्रधानांच्या हस्ते कृषी कर्मण पुरस्कार प्रदान
January 02nd, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातल्या तुमकुर इथल्या जाहीर सभेत प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांची कृषी कर्मण पुरस्कार आणि राज्यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठी पीएम किसान (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी)चा 2000 रुपयांचा तिसरा हफ्ता जारी केला, यामुळे सुमारे 6 कोटी लाभर्थ्यांना याचा लाभ मिळेल. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या निवडक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरीत केली. पंतप्रधानांनी 8 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील पीएम किसान अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रही प्रदान केली. तसेच पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या निवडक शेतकऱ्यांना खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौका आणि ट्रान्स्पॉडर्सच्या चाव्या प्रदान केल्या.पंतप्रधान कृषी कर्मण पुरस्कार प्रदान करणार
January 01st, 07:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 2 जानेवारी 2020 रोजी कर्नाटकातल्या तुमकुर येथे एका सार्वजनिक सभेत कृषी कर्मण पुरस्कार आणि प्रशंसा पुरस्कार राज्यांना प्रदान करतील. तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांचे कृषी कर्मण पुरस्कारही वितरित करतील.