पंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये कोटी दीपोत्सवास उपस्थिती
November 27th, 08:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे कोटी दीपोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड साथीच्या कठीण काळातही, आपण त्यामुळे उद्भवलेल्या सर्व समस्या आणि आव्हानांवर मात करण्यासाठी दिवे लावले होते. जेव्हा लोकांचा 'व्होकल फॉर लोकल'वर विश्वास असतो तेव्हा त्यांचा कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेवरील विश्वास पणत्या उजळवण्यातून व्यक्त होतो . उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या विविध श्रमिकांची सुखरुप सुटका व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.