विश्‍वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने पंतप्रधानांची भेट घेतली

January 03rd, 08:42 pm

पोस्ट केलेले: 03 जानेवारी 2025 8:42PM PIB दिल्ली द्वारे विश्‍वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताची मान गौरवाने उंचावल्‍याबद्दल कोनेरू हंपी हिचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल निश्चय स्पष्टपणे दिसून येत होते असे नमूद केले .