उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 13th, 02:10 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
December 13th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.डिजिटल परिवर्तनाच्या प्रगतीबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन
October 10th, 05:42 pm
आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करत, 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून आसियान-भारत संवाद संबंधांना चालना देत त्याची मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आसियान-भारत शिखर परिषद (2012) च्या दृष्टीकोन निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान-भारत स्मारक शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), शांततेसाठी इंडो-पॅसिफिकवरील आसियान दृष्टीकोन सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन, प्रदेशातील स्थैर्य आणि समृद्धी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन(2023) आणि संकटकालीन (2023) प्रतिसादात अन्न सुरक्षा आणि पोषण सशक्तीकरणावर आसियान-भारत संयुक्त नेत्यांचे निवेदनमुंबईतल्या 'अभिजात मराठी भाषा' कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
October 05th, 07:05 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई जी. अभिनेते बंधू सचिन जी, नामदेव कांबळे जी, सदानंद मोरे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक जी, मंगलप्रभात लोढा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष बंधू आशिष जी, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग
October 05th, 07:00 pm
मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.List of outcomes Official visit of Prime Minister Shri Narendra Modi to Russia
July 09th, 09:59 pm
List of outcomes Official visit of Prime Minister Shri Narendra Modi to RussiaPM Modi attends News18 Rising Bharat Summit
March 20th, 08:00 pm
Prime Minister Narendra Modi attended and addressed News 18 Rising Bharat Summit. At this time, the heat of the election is at its peak. The dates have been announced. Many people have expressed their opinions in this summit of yours. The atmosphere is set for debate. And this is the beauty of democracy. Election campaigning is in full swing in the country. The government is keeping a report card for its 10-year performance. We are charting the roadmap for the next 25 years. And planning the first 100 days of our third term, said PM Modi.पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्ली- अबू धाबी कॅम्पसमधल्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 13th, 07:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्ली-अबू धाबी कॅम्पसमधल्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचा हा नवा अध्याय सुरू झाला, इतकेच नाही, तर दोन्ही देशांतील युवकांनाही तो एकत्र आणत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.Prime Minister’s meeting with President of the UAE
February 13th, 05:33 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Abu Dhabi on an official visit to the UAE. In a special and warm gesture, he was received at the airport by the President of the UAE His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, and thereafter, accorded a ceremonial welcome. The two leaders held one-on-one and delegation level talks. They reviewed the bilateral partnership and discussed new areas of cooperation.आचार्य श्री एस. एन. गोयंका यांच्या 100 व्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दिलेला संदेश
February 04th, 03:00 pm
आचार्य श्री एस एन गोयंका जी यांच्या जन्मशताब्दी समारंभाची सुरुवात एक वर्षापूर्वी झाली होती. या एका वर्षात, देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासोबतच, कल्याण मित्र गोयंका जी यांच्या आदर्शांचे देखील स्मरण केले. आज जेव्हा त्यांच्या शताब्दी समारंभाची सांगता होत आहे, त्यावेळी, देश विकसित भारताचे संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने देखील वेगाने पुढे जात आहे. या प्रवासात, एस. एन गोयंका जी यांचे विचार आणि समाजाप्रती त्यांचे समर्पण यातून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. गुरुजी, भगवान बुद्धाचा मंत्र म्हणत असत—आचार्य एस एन गोयंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर चाललेल्या सोहळ्याच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 04th, 02:30 pm
विपश्यना ध्यानसाधनेचे गुरु, आचार्य एस एन गोयंका यांच्या वर्षभरापूर्वी जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रारंभाचे स्मरण करून, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राष्ट्राने ‘अमृत महोत्सव’ साजरा केला आणि त्याच वेळी कल्याण मित्र गोयंका यांच्या आदर्शांचेही स्मरण केले. आज जेव्हा या उत्सवांची सांगता होत आहे, तेव्हा देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. गोयंका गुरुजी अनेकदा उद्धृत करत असलेल्या भगवान बुद्धांच्या मंत्राचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि ते म्हणाले, “एकत्र ध्यान केल्याने त्याचे प्रभावकारक परिणाम मिळतात. ही एकात्मतेची भावना आणि एकतेची शक्ती हाच विकसित भारताचा मुख्य आधार आहे. वर्षभर याच मंत्राचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये कोटी दीपोत्सवास उपस्थिती
November 27th, 08:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे कोटी दीपोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड साथीच्या कठीण काळातही, आपण त्यामुळे उद्भवलेल्या सर्व समस्या आणि आव्हानांवर मात करण्यासाठी दिवे लावले होते. जेव्हा लोकांचा 'व्होकल फॉर लोकल'वर विश्वास असतो तेव्हा त्यांचा कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेवरील विश्वास पणत्या उजळवण्यातून व्यक्त होतो . उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या विविध श्रमिकांची सुखरुप सुटका व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
June 30th, 11:20 am
दिल्ली विद्यापीठाच्या या सुवर्णमय समारंभासाठी उपस्थित देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जी, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह जी, प्राध्यापक वर्ग,शिक्षक गण आणि माझ्या युवा मित्रांनो,दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
June 30th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला संबोधित केले. विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये उभारण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान विद्याशाखा, संगणक केंद्र आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. तसेच शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी खंड - शताब्दी समारंभाचे संकलन ; लोगो बुक - दिल्ली विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचा लोगो; आणि आभा - दिल्ली विद्यापीठाची 100 वर्षे यांचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.पंतप्रधानांचे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयटीआयच्या कौशल्य दीक्षांत समरोहातील भाषण
September 17th, 04:54 pm
मला आज देशातील लाखो आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. कौशल्य विकासाशी संबंधित विविध संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणविश्वातील इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष!विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कौशल दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित
September 17th, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कौशल दीक्षांत समारंभाला व्हिडीओ संदेशा द्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात जवळजवळ 40 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.2022 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 05th, 11:09 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र जी, अन्नपूर्णा देवी जी,देशभरातून आलेला शिक्षक वर्ग, तुमच्या माध्यमातून एक प्रकारे देशातल्या सर्व शिक्षकांशी मी संवाद साधत आहे.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी साधला संवाद
September 05th, 06:25 pm
शिक्षक दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला.अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 06th, 04:31 pm
आसामचे सामर्थ्यवान मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा जी, मंत्री अतुल बोरा जी, केशब महंता जी, पिजूष हजारिका जी, सुवर्ण महोत्सवी सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. दयानंद पाठक जी, अग्रदूतचे मुख्य संपादक आणि इतका दीर्घ काळ लेखणीने, ज्यांनी तपश्चर्या केली, साधना केली, असे कनकसेन डेका जी, , इतर मान्यवर, महोदय आणि महोदया,PM inaugurates Golden Jubilee celebrations of Agradoot group of newspapers
July 06th, 04:30 pm
PM Modi inaugurated the Golden Jubilee celebrations of the Agradoot group of newspapers. Assam has played a key role in the development of language journalism in India as the state has been a very vibrant place from the point of view of journalism. Journalism started 150 years ago in the Assamese language and kept on getting stronger with time, he said.