जागतिक आर्थिक व्यासपीठ परिषदेत दावोस येथे “क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड” याविषयावर पंतप्रधानांचे वक्तव्य ( 23 जानेवारी 2018)

January 23rd, 05:02 pm

दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

दावोसला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

January 21st, 09:04 pm

भारताचे चांगले मित्र आणि जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक प्रा. क्लाउस श्वाब यांच्या निमंत्रणावरुन दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत प्रथमच सहभागी होत असून मी उत्सुक आहे. यावर्षीच्या परिषदेची संकल्पना “दुभंगलेल्या जगात समाईक भवितव्याची निर्मिती” असून ती अगदी समर्पक आणि योग्य आहे.

जागतिक आर्थिक मंचाच्या संस्थापकांनी पंतप्रधानांची भेट घेतली

June 22nd, 01:46 pm

जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, प्रोफेसर क्लाउस श्वाब यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.