पंतप्रधानांनी किश्तवाडमधील अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल केला शोक व्यक्त

August 31st, 08:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किश्तवाड येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होणार

April 23rd, 11:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. तसेच ते देशभरातील ग्रामसभांना देखील संबोधित करणार आहेत. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासविषयक उपक्रमांचे उद्घाटन करून कोनशीला बसवतील. पंतप्रधान या वेळी अमृत सरोवर उपक्रमाची सुरुवात देखील करणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई येथे होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

किश्तवाडमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

February 03rd, 08:25 pm

किश्तवाडमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष- पंतप्रधान

July 28th, 12:38 pm

किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.