
बिहारमधील भागलपूर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 24th, 02:35 pm
मंचावर विराजमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, बिहार चे लोकप्रिय आणि बिहारच्या विकासासाठी समर्पित आमचे लाडके मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराजसिंह चौहान जी, जीतन राम मांझी जी, ललन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, राज्यमंत्री रामनाथ ठाकूर जी, बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय सिन्हा जी, राज्याचे इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधीगण, उपस्थित मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी,बिहारमधील भागलपूर येथून विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
February 24th, 02:30 pm
शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.याप्रसंगी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. मोदी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या भूमीमध्ये आध्यात्म,वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले. बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मला लाभले आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील पंतप्रधानांच्या टिप्पणीचा मजकूर
February 01st, 03:00 pm
आज भारताच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. हा प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. आम्ही अनेक क्षेत्रे तरुणाईसाठी खुली केली आहेत. सामान्य नागरिक, विकसित भारताच्या मोहिमेला पुढे घेऊन जाणार आहे. हा अर्थसंकल्प एक फोर्स मल्टिप्लायर म्हणजे बळ बहुगुणीत करणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल, वापर वाढेल आणि विकासालाही गती मिळेल. मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे , हा जनता जनार्दनाचा अर्थसंकल्प… लोकांचा अर्थसंकल्प दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.केंद्रिय अर्थसंकल्प 2025-26 वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
February 01st, 02:30 pm
आर्थिक वर्ष 2025-26 च्या केंद्रिय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. भारताच्या विकासाच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पात 140 कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकांचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारं खुली झाली आहेत आणि विकसित भारत हे अभियान आता सामान्य नागरिक पुढे नेतील. हा अर्थसंकल्प देशाचे सामर्थ्य कित्येक पटींनी वाढवणारा आहे. बचत, गुंतवणूक, क्रयशक्ती आणि विकास यामध्ये यामुळे वाढ होईल या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. जनतेचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी केंद्रिय अर्थ आणि आर्थिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.Our government's intentions, policies and decisions are empowering rural India with new energy: PM
January 04th, 11:15 am
PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.PM Modi inaugurates the Grameen Bharat Mahotsav 2025
January 04th, 10:59 am
PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर
December 25th, 01:00 pm
वीरांची भूमी बुंदेलखंडातील माझ्या सर्व बांधवांना माझा नमस्कार. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, येथील कार्यतत्पर मुख्यमंत्री भाई मोहन यादवजी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंहजी, वीरेंद्रकुमारजी, सीआर पाटीलजी, उपमुख्यमंत्री जगदीश देवडाजी, राजेंद्र शुक्लाजी, अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, अन्य मान्यवर, पूज्य संत मंडळी आणि मध्यप्रदेशातील माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी
December 25th, 12:30 pm
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याची आठवण करत मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या एका वर्षात हजारो कोटी रुपयांच्या नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे विकासकामांना गती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. आज ऐतिहासिक केन-बेतवा नदी जोड प्रकल्प, दौधन धरण आणि ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प या मध्य प्रदेशच्या पहिल्या सौर प्रकल्पाची पायाभरणी झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले.कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
December 23rd, 09:24 pm
आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 23rd, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.छत्तीसगडमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महतारी वंदन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 10th, 02:30 pm
माता दंतेश्वरी,माता बमलेश्वरी आणि माता महामाया यांना मी आदरपूर्वक नमन करतो. छत्तीसगडच्या माता भगिनींना माझा नमस्कार . दोन आठवड्यांपूर्वी मी छत्तीसगडमध्ये 35 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले होते.आणि आज मला नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी महतारी वंदन योजनेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले आहे. महतारी वंदन योजनेंतर्गत, छत्तीसगडमधील 70 लाखांहून अधिक माता-भगिनींना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. भाजप सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे. आज महतारी वंदन योजनेअंतर्गत 655 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेचा केला प्रारंभ
March 10th, 01:50 pm
आमचे सरकार प्रत्येक कुटुंबाचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि याची सुरुवात महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाने होतेगुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 22nd, 11:30 am
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, संसदेमधील माझे मित्र सी आर पाटील, अमूलचे अध्यक्ष श्यामल भाई, आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो! गुजरात मधील गावांनी मिळून 50 वर्षांपूर्वी जे रोप लावले होते ते आज विशाल वटवृक्ष बनले आहे आणि या विशाल वटवृक्षाच्या फांद्या आज देश परदेशात पसरल्या आहेत. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.गुजरात मधील दूध समितीशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक पुरुषाचे, प्रत्येक महिलेचे मी अभिनंदन करतो. याचबरोबर आपले एक आणखी मित्र आहेत जे दुग्ध व्यवसाय क्षेत्रातले सर्वात मोठे भागीदार आहेत. मी त्यांना सुद्धा नमस्कार करतो. हे भागीदार आहेत, आपले पशुधन. मी आज या प्रवासाला यशस्वी बनवण्यामध्ये पशुधनाच्या योगदानाला सुद्धा सन्मानित करत आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत आहे. त्यांच्या शिवाय दुग्ध व्यवसाय क्षेत्राची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि यासाठीच माझ्या देशातल्या पशुधनाला सुद्धा माझा प्रणाम आहे.गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधानांचा सहभाग
February 22nd, 10:44 am
गुजरातमध्ये अहमदाबाद मधील मोटेरा येथे नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आज आयोजित करण्यात आलेल्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ)सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला तसेच सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण देखील केले. जीसीएमएमएफ ही संस्था म्हणजे सहकारी संस्थांचा लवचिकपणा, या संस्थांची उद्योजकता विषयक उर्जा तसेच शेतकऱ्यांचा दृढ निश्चय यांचा पुरावाच आहे आणि त्याने अमूलला जगातील सशक्त दुग्धोत्पादन ब्रँड म्हणून स्थान मिळवून दिले आहे.गोव्यामधील विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 06th, 02:38 pm
गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले जी, येथील तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, इतर मान्यवर आणि गोव्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.समस्त गोंयकारांक, मना-कालझा सावन नमस्कार। तुमचो मोग अनी उर्बा पूड़ोंन, म्हाका गोयांत योन सदांच खोस सता।पंतप्रधानांनी गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 06th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. आज पायाभरणी तसेच उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये शिक्षण, क्रीडा, जलसंस्करण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 1930 सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही वितरित केले. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रेही सुपूर्द केली.तेलंगणातील करीमनगर येथील सुशिक्षित शेतकऱ्याने संमिश्र शेतीचा दृष्टिकोन अवलंबत आपले उत्पन्न केले दुप्पट
January 18th, 03:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.The farmhouse CM of BRS is destroying Telangana’s twin identity of Tradition & Technology: PM Modi
November 27th, 01:26 pm
Ahead of PM Modi’s relentless election campaign in poll-bound Telangana, he addressed a public rally in Mahabubabad. He said, “The people of Telangana are determined to oust the BRS Government and vote the BJP to power.” He added that both BRS-Congress have led Telangana to the path of destruction. He iterated, “It is BJP’s promise that once voted to power, Telangana will have a CM from the OBC community.”PM Modi addresses tremendous public rallies in election-bound Telangana’s Mahabubabad & Karimnagar
November 27th, 12:39 pm
Ahead of PM Modi’s relentless election campaign in poll-bound Telangana, he addressed tremendous public rallies in Mahabubabad and Karimnagar. He said, “The people of Telangana are determined to oust the BRS Government and vote the BJP to power.” He added that both BRS-Congress have led Telangana to the path of destruction. He iterated, “It is BJP’s promise that once voted to power, Telangana will have a CM from the OBC community.”KCR's promise of a Dalit CM, employment for the youth, and water for farmers remained unfulfilled: PM Modi
November 26th, 03:03 pm
In a spirited political rally held in Toopran, Telangana, Prime Minister Narendra Modi addressed a perse array of issues crucial to the forthcoming state assembly elections. PM Modi, while emphasizing the importance of addressing the needs of the people of Telangana, raised pertinent questions about the incumbent CM KCR’s governance and the promises made by his government.