किनलूर येथे ‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सच्या’ सिंथेटिक ट्रॅकचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

June 15th, 06:39 pm

‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सच्या’ उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी खेळाचे महत्व अधोरखित केले. ती म्हणाले की “sports शब्दाचा विस्तार केल्यास त्याचा अर्थ - एस म्हणजे स्कील अर्थात कौशल्ल्य, पी म्हणजे पर्सरव्हरंस अर्थात चिकाटी, ओ म्हणजे ऑप्टिमिझम अर्थात आशावाद, आर म्हणजे रेझीलियंस अर्थात लवचिकता, टी म्हणजे टेनॅसिटी अर्थात दृढता, एस म्हणजे स्टॅमिना अर्थात काम करण्याची शक्ती” पंतप्रधानांनी सांगितले की भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि योग्य प्रकारची संधी उपलब्ध करून देणे आणि प्रतिभांचे पोषण साधण्यासाठी पर्यावरणीय व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आमच्या देशातल्या महिलांनी सर्व क्षेत्रांत विशेषतः क्रीडा क्षेत्रांत उत्तम कामगिरी करून देशाचा अभिमान वाढविला आहे., असेही ते म्हणाले.