पंतप्रधानांनी ‘नागपूर मेट्रो फेज-2’ ची पायाभरणी केली आणि ‘नागपूर मेट्रो फेज 1’ राष्ट्राला समर्पित केला
December 11th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागपूर मेट्रो फेज 1’ राष्ट्राला समर्पित केला आणि आज खापरी मेट्रो स्थानकावर ‘नागपूर मेट्रो फेज-2’ ची पायाभरणी केली. खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या दोन मेट्रो रेल्वेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे तर दुसरा टप्पा 6700 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.