पर्यटनाचा मिशन मोडवर विकास साधणे या विषयावर आयोजित केलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन
March 03rd, 10:21 am
या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आजचा नवा भारत नव्या कार्यसंस्कृतीसह पुढे वाटचाल करत आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचीही खूप प्रशंसा झाली आहे, देशातील लोकांनी या अर्थसंकल्पाला खूप सकारात्मकपणे घेतलं आहे. देशात जुनी कार्य संस्कृती असती तर अर्थसंकल्पाबाबत अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा कुणी विचारही केला नसता. मात्र आज आमचं सरकार अर्थसंकल्पाच्या आधी आणि अर्थसंकल्पानंतरही अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाशी विस्तृत चर्चा करत असते, या सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असते. अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त फलनिष्पत्ती कशी करता येईल, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेच्या आत कशी पूर्ण होईल याबाबत, तसच अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अशा प्रकारचे वेबिनार उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपण हे जाणताच की सरकारचा प्रमुख म्हणून(गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून) काम करण्याचा मला वीस वर्षाहून जास्त अनुभव आहे. या अनुभवाचं सार हे आहे की जेव्हा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशी त्या निर्णयाशी संबंधित भागधारक सुद्धा जोडले जातात, सहभागी होतात तेव्हा त्या धोरणाचे परिणाम सुद्धा मनासारखे आणि वेळेत मिळतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आमच्या सोबत हजारो लोक सहभागी झाले, संपूर्ण दिवसभरात सर्वांनी मिळून खूप विचार मंथन केलं आणि मी हे सांगू शकतो की खूपच महत्त्वपूर्ण सूचना या वेबिनार मधून मांडल्या गेल्या आणि विशेष करुन आगामी काळाच्या अनुषंगाने पुढे आल्या. या वेबिनार मधून, जो अर्थसंकल्प आहे त्यावरच फक्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यातूनच प्राप्त परिस्थितीत कसं पुढे जाता येईल याबद्दल खूप उत्तम सूचना आल्या. आज आता आपण देशाच्या पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी हा वेबिनार करत आहोत.‘मिशन मोडमध्ये पर्यटन विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 03rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित करण्यात आलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आयोजित 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सच्या मालिकेतील हे सातवे वेबिनार आहे.Jamnagar is emerging as the hub of manufacturing and coast-led development: PM Modi
October 10th, 06:50 pm
PM Modi laid the foundation stone and dedicated to the nation multiple projects worth around Rs 1450 crore in Jamnagar, Gujarat. The PM informed everyone that five resolutions of development have created a solid foundation for the state of Gujarat. The first resolution is Jan Shakti, the second is Gyan Shakti, the third is Jal Shakti, the fourth is Urja Shakti and finally Raksha Shakti.PM lays the foundation stone and dedicates to the nation multiple projects worth over Rs 1450 crore in Jamnagar, Gujarat
October 10th, 06:49 pm
PM Modi laid the foundation stone and dedicated to the nation multiple projects worth around Rs 1450 crore in Jamnagar, Gujarat. The PM informed everyone that five resolutions of development have created a solid foundation for the state of Gujarat. The first resolution is Jan Shakti, the second is Gyan Shakti, the third is Jal Shakti, the fourth is Urja Shakti and finally Raksha Shakti.पंतप्रधानांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन
October 30th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार पटेल प्राणीसंग्रहालयाचे आणि जिओडेसिक आयव्हरी पद्धतीच्या घुमटाचे उद्घाटन केले. त्यांनी केवडिया एकात्मिक विकास अंतर्गत, 17 प्रकल्प देशाला समर्पित केले आणि 4 नवीन प्रकल्पांसाठी पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये जलपर्यटन मार्ग, न्यू गोरा ब्रिज, गरुडेश्वर बंधारा, सरकारी निवासस्थाने, बस बे टर्मिनस, एकता नर्सरी, खलवानी इको टूरिझम (पर्यावरणीय पर्यटन), आदिवासी होम स्टे यांचा समावेश आहे. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला एकता सागरी पर्यटन जहाज सेवेचा झेंडा दाखविला.