जागतिक गेंडा दिनानिमित्त गेंड्यांच्या संरक्षणाविषयीच्या बांधिलकीचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
September 22nd, 12:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त गेंड्यांच्या संरक्षणाविषयीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी नागरिकांना भारतातील एक शिंगी गेंड्यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास असणाऱ्या आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन केले.आसाममधील जोरहट येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 01:50 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित लोकप्रतिनिधी, इतर प्रतिष्ठित आणि आसामचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!! आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आहात, त्याबद्दल मी अगदी नतमस्तक होवून आपल्याला वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांनी आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी
March 09th, 01:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये आरोग्य, तेल आणि वायू, रेल्वे आणि गृहनिर्माण या क्षेत्रांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी दिली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट
March 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आसाममधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. नागरिकांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यावी आणि तिथल्या असामान्य नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले. यावेळी त्यांनी या ठिकाणाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या वन दुर्गा या महिला वनरक्षकांच्या पथकासोबत संवाद साधला आणि या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांची बांधिलकी आणि धैर्याची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांनी लखीमाई, प्रद्युम्न आणि फूलमाई या हत्तींना ऊस भरवतानाची काही छायाचित्रे देखील सामाईक केली.Prime Minister Narendra Modi to visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh
March 08th, 04:12 pm
Prime Minister will visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh on 8th-10th March, 2024