कौशल्य दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशांद्वारे दिलेले भाषण
October 12th, 01:00 pm
कौशल्य विकासाचा हा उत्सव खरोखरच अनोखा आहे. संपूर्ण देशात कौशल्य विकासाशी संबंधित संस्थांचा असा एकत्रित कौशल्य दिक्षांत सोहळा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम आजच्या भारताच्या प्राधान्यक्रमाचा दर्शक देखील आहे. देशातील हजारो युवक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. सर्व युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कौशल्य दीक्षांत समारंभ 2023 मध्ये केले मार्गदर्शन
October 12th, 12:49 pm
पंतप्रधानांनी यावेळी कोणत्याही देशाची ताकद उपयोगात आणण्यात युवाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक, आणि खनिज स्रोत, आपली किनारपट्टी अशा संसाधनाचा वापर करण्यासाठी युवा शक्ती असेल, तर त्या देशाचा विकास होतो आणि या संसाधनांना न्याय ही दिला जातो. आज, अशाच विचारांमुळे देशाची युवाशक्ती सक्षम होत आहे, आणि संपूर्ण व्यवस्थेत त्यामुळे सुधारणा होत आहेत, असे त्यांनी सांगितले. “या सगळ्यात देशाचा दृष्टिकोन द्वीपक्षीय आहे. एकीकडे, भारत आपल्या तरुणांना कौशल्य आणि शिक्षणाद्वारे नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करत आहे असे सांगत, त्यांनी सुमारे चार दशकांनंतर, त्यांच्या सरकारने तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला. सरकार मोठ्या संख्येने नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि आयआयटी, आयआयएम किंवा आयटीआय सारख्या कौशल्य विकास संस्थांची स्थापना करत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या कोट्यवधी तरुणांचा उल्लेख केला. तर दुसरीकडे, ज्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल, अशी पारंपरिक क्षेत्रे अधिकाधिक बळकट करण्याचा, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराला पाठिंबा देणाऱ्या नव्या क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले जात आहे, असे पंतप्रधानांनी संगितले.वस्तू निर्यात करण्यामध्ये तसेच मोबाईल निर्यात , इलेक्ट्रॉनिक निर्यात, सेवा निर्यात, संरक्षण निर्यात आणि उत्पादन क्षेत्रात भारताने नवे विक्रम प्रस्थापित केल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आणि त्याच बरोबर अंतराळ क्षेत्र, स्टार्टअप्स, ड्रोन, ॲनिमेश , इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर अशा अनेक क्षेत्रात तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी निर्माण केल्याचा उल्लेख केला.