कार्यकर सुवर्ण महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 07th, 05:52 pm
या कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवानिमित्त मी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणी प्रणाम करतो. आज प्रमुख स्वामी महाराजांच्या 103 व्या जयंतीचा महोत्सवदेखील आहे. गुरुहरी प्रगट ब्रह्म स्वरूप प्रमुख स्वामी महाराजांना मी नमन करतो. भगवान स्वामी नारायण यांची शिकवण, प्रमुख स्वामी महाराजांचे संकल्प... आज परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे सिद्धीस जात आहे. हा एवढा भव्य कार्यक्रम, एक लाख कार्यकर्ता, युवा आणि मुलांद्वारे बीज, झाडे आणि फळे यांचे सार अभिव्यक्त करणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम...... भलेही मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, परंतु या कार्यक्रमाची ऊर्जा मला माझ्या हृदयात जाणवत आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज आणि सर्व संतांचे अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो.अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर सुवर्ण महोत्सवाला केले मार्गदर्शन
December 07th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबाद येथील कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज, आदरणीय संत, आणि सत्संगी परिवाराचे सदस्य आणि अन्य सन्माननीय व्यक्तींचे स्वागत केले, व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यकर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणकमलांना वंदन केले आणि प्रमुख स्वामी महाराज यांची आज एकशे तीनवी जयंती असल्याचेही स्मरण त्यांनी केले. परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे भगवान स्वामी नारायण यांची शिकवण आणि प्रमुख स्वामी महाराज यांची वचने आज फळाला येत आहेत. जवळपास एक लाख कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेत, तरुणांचे व बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून भरवलेल्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते स्वतः या कार्यक्रमस्थळी उपस्थित नसले तरी ते त्यातील ऊर्जेचा अनुभव घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उच्च कोटीच्या दैवी समारंभाबद्दल त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांचे आणि सर्व संतांचे अभिनंदन केले.