विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 09th, 12:35 pm
मोदींची हमी देणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक गावात जो उत्साह दिसतो आहे तो भारताच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे. मग ते उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो किंवा अगदी लहान गाव किंवा मोठे गाव असो आणि काही गोष्टी समजल्यानंतर मी पाहिले आहे की, या वाहनाचा मार्ग जरी नसला तरीही लोक येऊन गावाच्या रस्त्यावर वाहन उभे करतात आणि सर्व माहिती घेतात, हे विलक्षण आहे. आणि मी काही लाभार्थींशी संवाद साधला आहे मला सांगण्यात आले की, या यात्रे दरम्यान 1.5 लाखाहून अधिक लाभार्थींना त्यांचे अनुभव कथन करण्याची संधी मिळाली आणि हे अनुभव नोंदवलेही गेले आहेत. आणि गेल्या 10-15 दिवसात गावातील लोकांच्या भावना काय आहेत, योजनांचे लाभ मिळाले आहेत का, त्यांची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे की नाही हे मी वेळोवेळी पाहिले आहे. त्यांना सर्व तपशील माहीत आहेत. जेव्हा मी तुमच्या चित्रफिती पाहतो, तेव्हा माझ्या गावातील लोक त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करतात हे पाहून मला खूप आनंद होतो.आता बघा कुणाला कायमस्वरूपी घर मिळाले तर त्याला असे वाटते की आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. एखाद्याला नळाद्वारे पाणी मिळाले तर त्याला वाटते की आजपर्यंत आपण पाण्यासाठी त्रासात जगत होतो, आज आपल्या घरात पाणी पोहोचले आहे.एखाद्याला शौचालय मिळाले तर त्याला इज्जत घर मिळाले असे वाटते.आणि जुन्या काळी केवळ प्रथितयश लोकांच्या घरात शौचालय असायचे, आता आमच्या घरात शौचालय आहे. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.आता तर आपल्या घरात शौचालये असतात. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.कुणाला मोफत उपचार मिळाले आहेत, कुणाला मोफत रेशन मिळाले आहे, कुणाला गॅस जोडणी मिळाली आहे, कुणाला वीज जोडणी मिळाली आहे, कुणी बँक खाते उघडले आहे, कुणाला पीएम किसान सन्मान निधी,कुणाला पीएम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे, काहींना पीएम स्वानिधी योजनेद्वारे मदत मिळाली आहे, काहींना पीएम स्वामित्व योजनेद्वारे मालमत्ता कार्ड मिळाले आहेत, म्हणजे मी योजनांची नावे सांगितली तर, मी पाहत होतो, भारताच्या कानाकोपऱ्यात गोष्टी पोहोचल्या आहेत. देशभरातील खेड्यापाड्यातील कोट्यवधी कुटुंबांना आपल्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा नक्कीच फायदा झाला आहे. आणि जेव्हा हा लाभ मिळतो तेव्हा एखाद्याचा विश्वास वाढतो. आणि जेव्हा या विश्वासाने जेव्हा छोटासा लाभ जरी मिमिळाला तरी जीवन जगण्यासाठी एक नवे बळ मिळते. आणि त्यासाठी त्यांना वारंवार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. भीक मागण्याची जी मनःस्थिती असायची ती आता गेली आहे. सरकारने लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली आणि नंतर त्यांना लाभ देण्यासाठी पावले उचलली. म्हणूनच आज लोक म्हणतात मोदींची हमी म्हणजे हमी, पूर्णत्वाची हमी.पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थींशी साधला संवाद
December 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु करण्यात आली आहे.We are against war, but peace is not possible without strength: PM Modi in Kargil
October 24th, 02:52 pm
Keeping in with his tradition of spending Diwali with armed forces, the PM Modi spent this Diwali with the forces in Kargil. Addressing the brave jawans, the Prime Minister said that the reverence for the soil of Kargil always draws him towards the brave sons and daughters of the armed forces.PM celebrates Diwali with Armed Forces in Kargil
October 24th, 11:37 am
Keeping in with his tradition of spending Diwali with armed forces, the PM Modi spent this Diwali with the forces in Kargil. Addressing the brave jawans, the Prime Minister said that the reverence for the soil of Kargil always draws him towards the brave sons and daughters of the armed forces.किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष- पंतप्रधान
July 28th, 12:38 pm
किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.