बिहारमधील काराकाट येथे विविध प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 30th, 11:29 am

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझी जी, लल्लन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, नित्यानंद राय जी, सतीश चंद्र दुबे जी, राजभूषण चौधरी जी, राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय कुमार सिन्हा जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील कराकत येथे 48,520 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

May 30th, 10:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील कराकत येथे 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेकविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना, या पवित्र भूमीवर बिहारच्या विकासाला गती देण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याचे म्हणत त्यांनी 48,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असल्याचे म्हणत बिहारच्या जनतेने दाखविलेली आपुलकी आणि प्रेमाबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांचा पाठिंबा आपल्यासाठी कायमच शिरोधार्य असल्याचे नमूद केले. त्यांनी बिहारच्या माता-भगिनींचेही मनापासून कौतुक केले.

दिनांक 29 आणि 30 मे रोजी पंतप्रधान सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशला देणार भेट

May 28th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 आणि 30 मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांना भेट देणार आहेत.

Today, Ramlala sits in a grand temple, and there is no unrest: PM Modi in Karakat, Bihar

May 25th, 11:45 am

Prime Minister Narendra Modi graced the historic lands of Karakat, Bihar, vowing to tirelessly drive the nation’s growth and prevent the opposition from piding the country on the grounds of inequality.

बिहारमध्ये पाटलीपुत्र, करकट आणि बक्सर येथील सभांना जमलेल्या उत्साही जनसमुदायाला पीएम मोदींनी संबोधित केले

May 25th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पाटलीपुत्र, करकट आणि बक्सर या ऐतिहासिक भूमीत घेतलेल्या सभांमध्ये देशाच्या विकासाला अथकपणे चालना देण्याचे आणि असमानतेच्या आधारावर विरोधकांना देशाची फाळणी करण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले.