उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महिलाकेन्द्री उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 21st, 04:48 pm
कार्यक्रमात उपस्थित उत्तर प्रदेशचे ऊर्जावान आणि कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, प्रयागराजचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी साध्वी निरंजन ज्योतिजी, श्रीमती अनुप्रिया पटेलजी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री डॉ महेंद्र सिंहजी, राजेन्द्र प्रताप सिंह मोतीजी, श्री सिद्धार्थनाथ सिंहजी, नन्दगोपाल गुप्ता नंदीजी, श्रीमती स्वाति सिंहजी, श्रीमती गुलाबो देवीजी, श्रीमती नीलिमा कटियारजी, संसदेतील माझ्या सहकारी भगीनी रीता बहुगुणाजी, श्रीमती हेमा मालिनीजी, श्रीमती केशरी देवी पटेलजी, डॉ संघमित्रा मौर्यजी, श्रीमती गीता शाक्यजी, श्रीमती कांता कर्दमजी, श्रीमती सीमा द्विवेदीजी, डॉ रमेश चंद बिन्दजी, प्रयागराजच्या महापौर श्रीमती अभिलाषा गुप्ताजी, जिल्हा पंचायत अध्यक्ष डॉ वीके सिंहजी, सर्व आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी गण, तसेच इथे उपस्थित उत्तर प्रदेशचे सामर्थ्य वाढवणाऱ्या इथल्या सामर्थ्याच्या प्रतीक माझ्या माता, भगिनी ! आपणा सर्वांस माझा प्रणाम।पंतप्रधानांची प्रयागराजला भेट, लाखो महिला उपस्थित असलेल्या कार्यक्रमात घेतला सहभाग
December 21st, 01:04 pm
या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी विख्यात हिंदी साहित्यिक आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. ते म्हणाले, प्रयागराज ही गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमाची भूमी आहे, जी हजारो वर्षांपासून आपल्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. आज हे तीर्थक्षेत्रही स्त्री-शक्तीचा असा अद्भुत संगम पाहत आहे, असे ते म्हणाले.