केंद्रीय मंत्रिमंडळाने 50,655 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल , वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी वाढेल

August 02nd, 08:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

कानपूर येथील भव्य रोड शोवेळी शहरवासीयांनी पंतप्रधान मोदींना दर्शवला पाठिंबा!

May 04th, 08:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शानदार रोड शो केला. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने रस्त्यावर जमले होते. उत्साही जनसमुदाय 'मोदी मोदी', 'भारत माता की जय' आणि 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत होता. पंतप्रधानांच्या ताफा शहरातून मार्गक्रमण करत असताना समर्थकांकडून करण्यात येत असलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षावातून त्यांचे प्रेम दिसण्याबरोबरच वातावरणात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर

December 28th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 11:15 वाजता पंतप्रधान पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. इतर अनेक रेल्वे प्रकल्पही ते देशाला समर्पित करतील. सुमारे 12:15 वाजता पंतप्रधान नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या आणि तिच्या आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प यांचा समावेश आहे. अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, संपर्क व्यवस्था सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास तसेच वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ होत आहे. यासह, अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, त्यामुळे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांचे सुशोभीकरण आणि सुधारणेला हातभार लागेल.

PM praises inauguration of civil enclave at Kanpur Airport

May 26th, 09:36 pm

The Prime Minister Shri Narendra Modi has said that the new civil enclave at Kanpur Airport will ease travel and expand opportunities.

हरमोहन सिंह यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांचे भाषण

July 25th, 04:31 pm

मी स्वर्गीय हरमोहन सिंह यादव यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक नमन करतो, माझी श्रद्धांजली वाहतो. मी सुखरामजी यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला इतक्या प्रेमाने आमंत्रित केले. माझी मनापासून इच्छा देखील होती की मी या कार्यक्रमासाठी कानपूरला येऊन आपल्या सर्वांसोबत उपस्थित राहावे. मात्र आज, आपल्या देशाच्या लोकशाहीचा मोठा क्षण देखील आहे. आज आपल्या नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी झाला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती देशाचं नेतृत्व करणार आहेत. हे आपल्या लोकशाहीच्या शक्तीचं, आपली सर्वसमावेशक विचारधारा याचं जिवंत उदाहरण आहे. या प्रसंगी आज दिल्लीत अनेक महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माझं दिल्लीत उपस्थित राहणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं देखील आहे. म्हणून मी आपल्याशी दूरदृष्यप्रणाली द्वारे जोडला जातो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

July 25th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. हरमोहन सिंग यादव हे माजी संसदपटू, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि यादव समाजातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि नेते होते.

पंतप्रधान 3 जून रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर

June 02nd, 03:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ येथे पोहोचतील.तिथे ते उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या तिसऱ्या (3.0) पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1:45 च्या सुमाराला , पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील.हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

Voting turnout in second phase polling in Uttar Pradesh points at BJP returning to power again: PM Modi

February 14th, 12:10 pm

Amidst the ongoing election campaigning in Uttar Pradesh, PM Modi’s rally spree continued as he addressed an election rally in Kanpur Dehat today. The Prime Minister expressed his gratitude towards the people for their support and said, “Voting is going on in the second phase in Uttar Pradesh, Uttarakhand and Goa today. I would urge all the voters, especially the first-time voters, to come out to vote in maximum numbers.”

PM Modi addresses a public meeting in Kanpur Dehat, Uttar Pradesh

February 14th, 12:05 pm

Amidst the ongoing election campaigning in Uttar Pradesh, PM Modi’s rally spree continued as he addressed an election rally in Kanpur Dehat today. The Prime Minister expressed his gratitude towards the people for their support and said, “Voting is going on in the second phase in Uttar Pradesh, Uttarakhand and Goa today. I would urge all the voters, especially the first-time voters, to come out to vote in maximum numbers.”

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कानपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन, मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत केला मेट्रोतून प्रवास

December 28th, 02:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या भागाचे उद्घाटन झाले. नव्याने सुरू झालेल्या या सेवेचे उद्घाटन आणि पाहणी केल्यानंतर लगेचच, पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मेट्रोतून प्रवास केला.

कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 28th, 01:49 pm

उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.

कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन

December 28th, 01:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Embrace challenges over comforts: PM Modi at IIT, Kanpur

December 28th, 11:02 am

Prime Minister Narendra Modi attended the 54th Convocation Ceremony of IIT Kanpur. The PM urged the students to become impatient for a self-reliant India. He said, Self-reliant India is the basic form of complete freedom, where we will not depend on anyone.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ संपन्न , ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदव्यांचा केला प्रारंभ

December 28th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ झाला यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 डिसेंबर रोजी कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार

December 26th, 04:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबरला ( मंगळवारी) कानपूरला भेट देणार असून दुपारी दीड वाजता, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाइन प्रकल्पाचेही उद्घाटन करणार आहेत. त्याआधी, सकाळी 11 वाजता, पंतप्रधान आयआयटी कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभात देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

28 डिसेंबर 2021 रोजी आयआयटी, कानपूरच्या दीक्षांत समारंभात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी तुमच्या सूचना शेअर करा

December 21st, 07:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, 28 डिसेंबर 2021 रोजी आयआयटी, कानपूरच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. आयआयटी कानपूरसह, इतर आयआयटीचे विद्यार्थ्यांना तसेच जागतिक स्तरावर पसरलेल्या IIT च्या माजी विद्यार्थ्यांच्या जाळ्यांतील सर्वांना पंतप्रधानांच्या भाषणासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन करीत आहोत. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात यापैकी काही सूचनांचा समावेश करू शकतात.

अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 14th, 12:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन

September 14th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.

पंतप्रधान उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार

September 13th, 11:20 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार आहेत, त्यानंतर त्यांचे यानिमित्ताने भाषण होईल. पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगढ नोड येथील आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील.

प्रमुख विज्ञान संस्थांशी साधलेल्या संवादाबाबत पंतप्रधानांनी केलेले ट्विटस्

July 08th, 03:57 pm

केंद्र पुरस्कृत तंत्रज्ञान संस्थांच्या 100 हून अधिक संचालकांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सादरीकरण केलेल्या देशातील प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांबरोबर साधलेल्या संवादातील माहिती सामायिक केली. आयआयएससी बंगळुरू , आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी कानपूर यांच्याबद्दल पंतप्रधानांनी ट्विट केले.