अमेरिकेच्या 246 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

July 04th, 11:40 pm

अमेरीकेच्या 246 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरीस आणि अमेरीकी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोविड संदर्भातील दुसऱ्या जागतिक आभासी शिखर परिषदेच्या उद्‌घाटनपर सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 12th, 08:58 pm

कोविड महामारीमुळे मानवी जीवन आणि पुरवठा साखळ्या यांच्यात अडचणी निर्माण होणे सुरुच आहे आणि त्यासोबतच मुक्त समाजाच्या सहनशक्तीची देखील परीक्षा घेतली जात आहे. भारतात, आपण या महामारीविरुद्ध लोकाभिमुख धोरण स्वीकारले आहे. या वर्षीच्या आमच्या वार्षिक आरोग्यसेवेच्या तरतुदीसाठी आम्ही आतापर्यंतचा आरोग्य क्षेत्रासाठीचा सर्वात जास्त निधी राखून ठेवला आहे.

दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये पंतप्रधान सहभागी

May 12th, 06:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये सहभाग घेतला. या परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात पंतप्रधानांनी 'महामारीमुळे आलेला थकवा टाळणे आणि तयारीला प्राधान्य' या विषयावर भाषण केले.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक वक्तव्य

September 24th, 02:15 am

सर्वप्रथम, माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो . महामहीम , काही महिन्यांपूर्वी आपल्याला दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही खूपच आत्मीयतेने आणि सहजतेने बोललात, ते माझ्या नेहमी लक्षात राहील आणि यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. महामहीम, तुम्हाला जर आठवत असेल, तो खूप कठीण काळ होता. भारताला कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता, आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. त्यावेळी एखाद्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही आपुलकीने मदतीचा हात पुढे केला. जेव्हा तुम्ही माझ्याशी बोललात , तेव्हा तुम्ही जे शब्द वापरले, ते माझ्या नेहमीच लक्षात राहतील आणि मी मनापासून तुमचे आभार मानतो. महामहिम, एका खऱ्या मित्राप्रमाणे, तुम्ही संवेदनशीलतेने सहकार्याचा संदेश दिला होता आणि त्यानंतर लगेच अमेरिका सरकार, अमेरिकेचे कॉर्पोरेट क्षेत्र आणि भारतीय समुदाय, सर्वजण भारताला मदत करण्यासाठी एकत्र आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात बैठक

September 24th, 02:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूअमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेच्या उपराष्ट्र्पती कमला हॅरिस यांची 23 सप्टेंबर 2021 रोजी भेट घेतली.

अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

September 22nd, 10:37 am

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार मी 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे.

कमला हॅरिस यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

January 21st, 09:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांचे अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

November 17th, 11:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन

November 08th, 10:23 am

पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे अभिनंदन केले आहे.