गरिबाच्या मुलाच्या नेतृत्वाखालील या सरकारने गरिबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे: पंतप्रधान मोदी कल्याणमध्ये
May 15th, 04:45 pm
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील कल्याण येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले: मी अभिमानाने सांगू शकतो की, देशाचे हित आणि गरिबांचे कल्याण हा आजच्या राजकीय वातावरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आली, पण राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मात्र नाकारण्यात आले.महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथील भव्य सभांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रेरणादायी भाषणे
May 15th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथे घेतलेल्या भव्य सभांमध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी आपल्या विकसित भारताबद्दलच्या आपल्या व्हिजनचा ऊहापोह केला. ते म्हणाले: सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाची आवश्यक कामे आणि कोणते निर्णय घेतले जावेत यावर आम्ही सातत्याने विचार केलेला आहे.