सरकारने देशाच्या सर्वांगीण पायाभूत विकासावर विशेष भर दिला आहे: पंतप्रधान मोदी

June 17th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोच्ची मेट्रोचे उद्‌घाटन केले आणि नवीन मेट्रो मार्गावर थोड्या अंतराचा प्रवास केला. त्यानंतर कोच्ची मेट्रो राष्ट्राला समर्पित करण्यासाठी आयोजित समारंभाला उपस्थित मोठ्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केले. सरकारने देशाच्या सर्वांगीण पायाभूत विकासावर विशेष भर दिला आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोच्ची मेट्रोमध्ये पहिला प्रवास केला

June 17th, 11:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोच्ची मेट्रोमध्ये पहिला प्रवास केला. पालारीवत्तम मेट्रो स्टेशनचे उद्घाटन केल्यानंतर ते गाडीत चढले. यावेळी राज्यपाल पी. सथाशिवम, मुख्यमंत्री पिनराई विजयन, ई. श्रीधरन आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू पंतप्रधानांच्या सोबत होते.