कोविड-19 स्थितीविषयी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन

April 08th, 09:24 pm

आपण सर्वांनी वर्तमानातल्या परिस्थितीचे गांभीर्याने विश्लेषण करून अनेक महत्वपूर्ण मुद्दे समोर ठेवले आहेत आणि अनेक आवश्यक सल्लेही दिले आहेत आणि स्वाभाविक गोष्ट म्हणजे, ज्या भागामध्ये कोरोना रूग्णांचा मृत्यू जास्त संख्येने होत आहे, जिथे कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे, त्या राज्यांबरोबर विशेषत्वाने चर्चा केली. मात्र उर्वरित राज्यांकडेही खूप चांगले सल्ले असू शकतात. त्यामुळे माझा आग्रह असा आहे की, आपल्याला जर काही सकारात्मक सल्ले देणे आवश्यक वाटत असेल तर ते जरूर माझ्यापर्यंत पोहोचवावेत. त्याचा उपयोग कोणतीही रणनीती तयार करताना होऊ शकेल.

कोविड-19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

April 08th, 09:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 च्या परिस्थितीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.