श्री गुरू तेग बहादूरजी हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
December 06th, 08:07 pm
श्री गुरू तेग बहादूर जी हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. न्याय, समानता आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले.चंदीगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे राष्ट्रार्पण
December 02nd, 07:05 pm
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनशील नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 डिसेंबर 2024 रोजी चंदीगड येथे दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमात ही अंमलबजावणी देशाला समर्पित करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले भाषण
August 31st, 10:30 am
तुम्ही लोक खूप गंभीर आहात, त्यामुळे मला असे वाटते की हा सोहळाही खूप गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी मी राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाला गेलो होतो. आणि, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा आहे भारताच्या संविधानाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रवास! हा प्रवास आहे- एक लोकशाही म्हणून भारताचा अधिक परिपक्व होण्याचा प्रवास! आणि या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक जाणकारांचे योगदान मोलाचे आहे. यात पिढ्यानपिढ्या कोट्यवधी देशबांधवांचे योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. भारतातील जनतेने सर्वोच्च न्यायालयावर, आपल्या न्यायव्यवस्थेवर कधीच अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ही 75 वर्षे लोकशाहीची माता म्हणून भारताचा बहुमान आणखी वाढवत आहेत. हे आपल्या सांस्कृतिक घोषणेला बळ देते – ज्यामध्ये म्हटले आहे सत्यमेव जयते, नानृतम्. यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून संविधानाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे या प्रसंगी अभिमानही आहे, सन्मान आहे आणि प्रेरणा आहे. या निमित्त मी तुम्हा सर्व विधिज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे केले उदघाटन
August 31st, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी 75 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन देखील केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी पाच कामकाजांची सत्रे आयोजित केली आहेत; ज्यात पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटल्यांचे व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,या विषयांचा समावेश आहे.कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक.
February 21st, 11:12 am
कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दु:ख व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे करणार उद्घाटन
September 22nd, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे उद्घाटन करतील. पंतप्रधान या परिषदेला मार्गदर्शनही करतील.रिपब्लिक टीव्ही कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांचे भाषण
April 26th, 08:01 pm
अर्णब गोस्वामी जी, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सर्व सहकारी, रिपब्लिक टीव्हीचे देश-विदेशातील सर्व प्रेक्षक, महिला -पुरुषगण , माझे म्हणणे मांडण्यापूर्वी मला तुम्हाला माझ्या लहानपणी जो विनोद ऐकायचो, तो सांगायचा आहे. एक प्राध्यापक होते आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली, मी जीवनाला कंटाळले आहे, मला जगायचे नाही, म्हणून मी कांकरिया तलावात उडी मारून जीव देईन अशा आशयाची चिट्ठी तिने लिहून ठेवली होती . सकाळी पाहिले की मुलगी घरात नाही. तेव्हा पलंगावर चिट्ठी बघून वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, मी प्राध्यापक आहे, इतकी वर्षे मी शिकवले, तरीही कांकरिया स्पेलिंग चुकीचं लिहून गेली आहे. असो, मला आनंद आहे की अर्णब उत्तम हिंदी बोलू लागले आहेत . ते काय म्हणाले मी ऐकले नाही, मात्र हिंदी बरोबर आहे की नाही, हे मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो आणि कदाचित मुंबईत राहिल्यामुळे तुम्ही हिंदी चांगले शिकले असावेत .नवी दिल्लीत आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 26th, 08:00 pm
नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 03rd, 03:50 pm
काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन
April 03rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.कायदा मंत्री आणि सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 15th, 12:42 pm
देशाच्या आणि सर्व राज्यांच्या कायदा मंत्री आणि सचिवांची ही महत्वाची बैठक, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य पार्श्वभूमीवर होत आहे. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, लोकहितासाठी सरदार पटेल यांनी दिलेली प्रेरणा, आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाईल आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत देखील पोचवेल.गुजरातच्या एकता नगर इथे होत असलेल्या विधी मंत्री आणि विधीसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन
October 15th, 12:16 pm
देशभरातील विधिमंत्री आणि विधिसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेची सुरुवात आज गुजरातमध्ये झाली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.नवी दिल्ली येथील पहिल्या अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 30th, 10:01 am
भारताच्या न्यायव्यवस्थेचं नेतृत्व करत असलेल्या आपणा सर्वांमध्ये येणं नेहमीच एक सुखद अनुभव असतो, पण बोलणं जरा कठीण असतं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या अध्यक्षांची ही अशा प्रकारची पहिली राष्ट्रीय बैठक आहे आणि मी असं समजतो की ही एक चांगली, शुभ सुरुवात आहे, म्हणजेच हे यापुढेही सुरु राहील. अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी आपण निवडलेली वेळ अचूक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची देखील आहे. आजपासून थोड्याच दिवसांनी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहे. हा काळ आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत काळाची वेळ आहे. ही वेळ त्या संकल्पांची आहे, जे पुढील 25 वर्षांत देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील. देशाच्या या अमृत यात्रेत, ईझ ऑफ डूइंग बिझनेस (व्यापार सुलभता) आणि ईझ ऑफ लिव्हिंग (जगण्यातील सुलभता) प्रमाणेच ईझ ऑफ जस्टीस (न्याय मिळण्यातील सहजता) देखील तेवढीच महत्वाची आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतील. या कार्यक्रमासाठी मी विशेषतः ललितजी यांचे आणि आपल्या सर्वांचं विशेष अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो.PM addresses inaugural session of First All India District Legal Services Authorities Meet
July 30th, 10:00 am
PM Modi addressed the inaugural session of the First All India District Legal Services Authorities Meet. The Prime Minister said, This is the time of Azadi Ka Amrit Kaal. This is the time for the resolutions that will take the country to new heights in the next 25 years. Like Ease of Doing Business and Ease of Living, Ease of Justice is equally important in this Amrit Yatra of the country.हरमोहन सिंह यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांचे भाषण
July 25th, 04:31 pm
मी स्वर्गीय हरमोहन सिंह यादव यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक नमन करतो, माझी श्रद्धांजली वाहतो. मी सुखरामजी यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला इतक्या प्रेमाने आमंत्रित केले. माझी मनापासून इच्छा देखील होती की मी या कार्यक्रमासाठी कानपूरला येऊन आपल्या सर्वांसोबत उपस्थित राहावे. मात्र आज, आपल्या देशाच्या लोकशाहीचा मोठा क्षण देखील आहे. आज आपल्या नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी झाला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती देशाचं नेतृत्व करणार आहेत. हे आपल्या लोकशाहीच्या शक्तीचं, आपली सर्वसमावेशक विचारधारा याचं जिवंत उदाहरण आहे. या प्रसंगी आज दिल्लीत अनेक महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माझं दिल्लीत उपस्थित राहणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं देखील आहे. म्हणून मी आपल्याशी दूरदृष्यप्रणाली द्वारे जोडला जातो आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
July 25th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. हरमोहन सिंग यादव हे माजी संसदपटू, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि यादव समाजातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि नेते होते.भाई तारू सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन
October 09th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाई तारू सिंह जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.PM pays tribute to Subramania Bharati on his 100th Punya Tithi
September 11th, 11:06 pm
On his 100th Punya Tithi, paying homage to the remarkable Subramania Bharati. We recall his rich scholarship, multi-faceted contributions to our nation, noble ideals on social justice and women empowerment. - PM Narendra Modiसंसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये127 वे घटना दुरुस्तीविधेयक, 2021 संमत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
August 11th, 11:00 pm
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 127 वे घटना दुरुस्ती विधेयक, 2021संमत होणे हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.PM Modi addresses public meetings at West Bengal’s Bardhaman, Kalyani and Barasat
April 12th, 11:59 am
PM Modi addressed three mega rallies in West Bengal’s Bardhaman, Kalyani and Barasat today. Speaking at the first rally the PM said, “Two things are very popular here- rice and mihi dana. In Bardhaman, everything is sweet. Then tell me why Didi doesn't like Mihi Dana. Didi's bitterness, her anger is increasing every day because in half of West Bengal's polls, TMC is wiped out. People of Bengal hit so many fours and sixes that BJP has completed century in four phases of assembly polls.”