तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या समर्पणाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 03rd, 12:15 pm
चंदीगडमध्ये आलो की मला माझ्याच लोकांमध्ये आल्यासारखे वाटते. चंदीगडची ओळख शक्तीस्वरूपा माँ चंडिका देवीच्या नावाशी जोडलेली आहे. माँ चंडी म्हणजे शक्तीचे असे स्वरूप, जे सत्य आणि न्यायाची पाठराखण करते. हीच भावना भारतीय न्याय संहिता आणि नागरी सुरक्षा संहितेच्या संपूर्ण मसुद्याचा पाया आहे. आज देश विकसित भारताच्या संकल्पासह आगेकूच करतो आहे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत... अशा वेळी संविधानाच्या भावनेने प्रेरित भारतीय न्यायिक संहितेची अंमलबजावणी होते आहे, ही एक मोठी सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी कल्पना केलेल्या आदर्शांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक ठाम प्रयत्न आहे. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होईल, याचे प्रात्यक्षिक अर्थात लाईव्ह डेमो मी आता पाहत होतो. आणि मी इथल्या प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी वेळ काढून हा लाईव्ह डेमो पाहावा. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी पहावे, बार मधील सहकाऱ्यांनी पहावे, न्यायपालिकेच्या मित्रांना शक्य असले, तर त्यांनीही पहावे. या निमित्ताने मी सर्व देशवासियांना भारतीय न्याय संहिता, नागरी संहिता लागू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि चंदीगड प्रशासनाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे लोकार्पण
December 03rd, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड येथे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनकारी नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केली. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी चंडीगढची ओळख सत्य आणि न्याय प्रस्थापित करणारी शक्ती माँ चंडी देवीशी निगडित असल्याचे नमूद केले . हेच तत्त्वज्ञान भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या संपूर्ण स्वरूपाचा आधार असल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेच्या भावनेने प्रेरित भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हा एक गौरवशाली क्षण होता कारण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण करण्याच्या तसेच भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होता असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी ज्या आदर्शांची कल्पना केली , ती पूर्ण करण्याच्या दिशेने हा एक ठोस प्रयत्न आहे. मोदी म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची याची झलक त्यांना थेट प्रात्यक्षिकातून पहायला मिळाली. पंतप्रधानांनी लोकांना कायद्यांचा हा लाईव्ह डेमो पाहण्याचे आवाहन केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चंदीगड प्रशासनातील सर्व संबंधितांचेही त्यांनी अभिनंदन केले.जोधपुर इथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहोळ्यातले पंतप्रधानांचे संबोधन
August 25th, 05:00 pm
कार्यक्रमाला उपस्थित राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ कृष्णराव बागड़े जी, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, न्यायमूर्ती संजीव खन्ना जी, देशाचे कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल जी, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मणींद्र मोहन श्रीवास्तव जी, इतर सर्व माननीय न्यायाधीश, न्याय जगतातले सर्व मान्यवर, उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,जोधपूरमधील राजस्थान येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
August 25th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोधपूरमधील राजस्थान येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचे देखील उद्घाटन केले.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित आंतरराष्ट्रीय अधिवक्ता परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
September 23rd, 10:59 am
जगभरातील विधी क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींना भेटण्याची आणि त्यांच्या समवेत उपस्थितीत राहण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. भारताच्या सर्व भागातील लोक आज येथे उपस्थित आहेत. या परिषदेसाठी इंग्लंडचे लॉर्ड चॅन्सेलर आणि इंग्लंडच्या बार असोसिएशनचे प्रतिनिधीही आपल्यामध्ये आहेत. राष्ट्रकुल आणि आफ्रिकन देशांचे प्रतिनिधीही यात सहभागी होत आहेत. एक प्रकारे, ही आंतरराष्ट्रीय वकील परिषद भारताच्या 'वसुधैव कुटुंबकम' (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे) या भावनेची प्रतीक ठरली आहे. भारतातील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो. हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी मनापासून पार पाडणाऱ्या बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मी विशेष अभिनंदन करतो.‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद -2023 याचे नवीदिल्ली येथे पंतप्रधानांनी केले उदघाटन'
September 23rd, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘आंतरराष्ट्रीय विधिज्ञ परिषद 2023 चे उद्घाटन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विविध कायद्याच्या विषयांवर अर्थपूर्ण संवाद आणि चर्चेसाठी व्यासपीठ म्हणून कार्य करणे, संकल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कायद्याव्यवस्थेतील समस्या समजून घेणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावेळी पंतप्रधानांचे भाषण
February 10th, 04:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.राष्ट्रपतींच्या आभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर
February 10th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.Rule of Law has been the basis of our civilization and social fabric: PM
February 06th, 11:06 am
PM Modi addressed Diamond Jubilee celebrations of Gujarat High Court. PM Modi said, Our judiciary has always interpreted the Constitution positively and strengthened it. Be it safeguarding the rights of people or any instance of national interest needed to be prioritised, judiciary has always performed its duty.गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
February 06th, 11:05 am
गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते या उच्च न्यायालयाच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन झाले. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद, सर्वोच्च आणि गुजरात उच्च न्यायालायातील न्यायाधीश, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि कायदा क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.ओदिशातील संबलपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्था-आयआयएमच्या कायमस्वरूपी कॅम्पसच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास केला. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, धमेंद्र प्रधान आणि प्रतापचंद्र सरंगी उपस्थित होते.पंतप्रधानांनी केला आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास
January 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास केला. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, धमेंद्र प्रधान आणि प्रतापचंद्र सरंगी उपस्थित होते.The people of India are our high command, we are committed to fulfill all their aspirations: PM Modi
November 24th, 11:45 am
Prime Minister Narendra Modi today addressed two huge public meeting in Chhatarpur and Mandsaur in Madhya Pradesh in a series of similar rallies previously organised in the poll-bound state of Madhya Pradesh.Reject the negative politics of Congress: PM Modi urges people of Madhya Pradesh
November 24th, 11:45 am
Prime Minister Narendra Modi today addressed two huge public meeting in Chhatarpur and Mandsaur in Madhya Pradesh in a series of similar rallies previously organised in the poll-bound state of Madhya Pradesh.देश महिला नेतृत्वाखालील विकासाकडे वाटचाल करत आहे
May 04th, 09:47 am
नरेंद्र मोदी मोबाइल अॅपद्वारे संवादाच्या शृंखलेत कर्नाटकच्या भाजप महिला मोर्चाबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधला. समाजातील स्त्रियांच्या भूमिकेची आणि त्यांच्या सहभागाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, महिला केवळ महिलां विकासापासून महिला प्रणीत विकासाकडे वाटचाल करत आहे.देश महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे जात आहे : भाजप महिला मोर्चाशी संवादाच्या वेळी पंतप्रधान मोदी
May 04th, 09:46 am
नरेंद्र मोदी मोबाइल अॅपद्वारे संवादाच्या शृंखलेत कर्नाटकच्या भाजप महिला मोर्चाबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधला. समाजातील स्त्रियांच्या भूमिकेची आणि त्यांच्या सहभागाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, महिला केवळ महिलां विकासापासून महिला प्रणीत विकासाकडे वाटचाल करत आहे.कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 20th, 05:47 pm
संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.“कृषी 2022- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन
February 20th, 05:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कृषी 2022-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या दिल्लीत पुसा इथल्या एनएएसी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली.7 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
February 07th, 05:01 pm
आदरणीय सभापतीजी, आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विस्तृत चर्चा या सभागृहाने केली आहे. सुमारे 38 मान्यवर सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत.राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर
February 07th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. महात्मा गांधींचे स्मरण करून त्यांनी, तळागाळातल्या पातळीवर लोकांच्या आयुष्यात बदल करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला.