पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत

December 05th, 03:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भूतानचे महामहिम राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानच्या महाराणी जेसन पेमा वांगचुक यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी भूतानच्या राजांना शुभेच्छा दिल्या आणि मार्च 2024 मधील भेटीदरम्यान भूतानचे सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या प्रेमळ आदरातिथ्याची आठवण करून दिली.

भूतानच्या राजांतर्फे पंतप्रधानांना अभिनंदनपर दूरध्वनी

June 05th, 08:05 pm

देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भूतानचे राजे, महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. यावेळी भूतानच्या राजांनी पंतप्रधानांना हार्दिक शुभेच्छा देऊन पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेला सतत प्रगती आणि समृद्धी लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.

पंतप्रधानांनी भूतानच्या राजांची घेतली भेट

March 22nd, 06:32 pm

भारत-भूतान मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण आणि अनोख्या संबंधाबद्दल पंतप्रधान आणि भूतानचे राजे यांनी समाधान व्यक्त केले. उभय देशांमध्ये मैत्री आणि सहकार्याचे दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने ड्रुक ग्याल्पो पुरस्काराने दिलेल्या मार्गदर्शक दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान भूतानमध्ये दाखल

March 22nd, 09:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 - 23 मार्च 2024 या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे.

पंतप्रधानांचा भूतान दौरा (21 - 22 मार्च 2024)

March 22nd, 08:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21- 22 मार्च 2024 या कालावधीत भूतानचा दौरा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे.

पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची घेतली भेट

April 04th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली.