झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
November 16th, 08:23 am
उत्तर प्रदेशात झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना सर्व प्रकारची मदत करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
September 05th, 10:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे मोदी यांनी अभिनंदन केले.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.झाशी येथील जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकामुळे परिसरात पर्यटन आणि व्यापार वाढीला अधिक चालना मिळेल- पंतप्रधान
March 26th, 10:54 am
झाशी येथील जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक झाले आहे, त्यामुळे झाशी आणि आसपासच्या भागात पर्यटन आणि व्यापार वाढीला अधिक चालना मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभर आधुनिक रेल्वे स्थानकं निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा हा एक अविभाज्य भाग असल्याचंही श्री मोदी म्हणाले.राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण
November 19th, 08:58 am
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्य आणि आपल्या देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही.PM Modi addresses a public meeting in Fatehpur, Uttar Pradesh
February 17th, 04:07 pm
Addressing an election rally in Uttar Pradesh’s Fatehpur to campaign for the BJP for the upcoming state polls, Prime Minister Narendra Modi said, “I am coming from Punjab. The mood in Punjab is to vote for BJP. Every phase of UP polls is voting for BJP. The people of Uttar Pradesh are determined to hold colourful celebrations of victory on 10th March, ahead of Holi.”Coronavirus and those opposing vaccine are scared of it: PM Modi in Fatehpur, Uttar Pradesh
February 17th, 04:01 pm
Addressing an election rally in Uttar Pradesh’s Fatehpur to campaign for the BJP for the upcoming state polls, Prime Minister Narendra Modi said, “I am coming from Punjab. The mood in Punjab is to vote for BJP. Every phase of UP polls is voting for BJP. The people of Uttar Pradesh are determined to hold colourful celebrations of victory on 10th March, ahead of Holi.”पंतप्रधानांकडून राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना राष्ट्रीय सेना दिनाच्या शुभेच्छा
November 28th, 06:14 pm
पंतप्रधानांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेच्या भारतभरातील माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना माजी विद्यार्थी संस्थेला सहकार्य करावे आणि संस्थेच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.भारताच्या विकास गाथेचा हाच टर्निंग पॉईंटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 28th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.उत्तर प्रदेशातील झाशी येथे 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 19th, 05:39 pm
जौन धरती पै हमाई रानी लक्ष्मीबाई जू ने, आजादी के लाने, अपनो सबई न्योछार कर दओ, वा धरती के बासियन खों हमाऔ हाथ जोड़ के परनाम पौंचे। झाँसी ने तो आजादी की अलख जगाई हती। इतै की माटी के कन कन में, बीरता और देस प्रेम बसो है। झाँसी की वीरांगना रानी लक्ष्मी बाई जू को, हमाओ कोटि कोटि नमन।उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला पंतप्रधानांची उपस्थिती
November 19th, 05:38 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला उपस्थिती दर्शवली. झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ या भव्य समारंभात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या अनेक नवीन उपक्रमांचे राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी छात्र संघटनेचा शुभारंभ, या संघटनेत पंतप्रधानांनी पहिले सदस्य म्हणून नोंदणी केली ; यासह एनसीसी छात्रांसाठी सदृशीकरण प्रशिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ; राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेला मंडप ; राष्ट्रीय युद्ध स्मारक मोबाईल अॅप; भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आरेखन आणि विकसित केलेले अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट 'शक्ती'; हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेच्या झाशी नोड येथे भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली.उत्तर प्रदेशातल्या महोबा इथे विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 19th, 02:06 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री डॉक्टर महेंद्र सिंह, जीएस धर्मेश जी, संसदेतले माझे सहकारी आर के सिंह पटेल जी, पुष्पेंद्र सिंह जी, उत्तर प्रदेश विधान परिषद आणि विधानसभेतले स्वतंत्रदेव सिंह जी, राकेश गोस्वामी जी, इतर लोक प्रतिनिधी आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण
November 19th, 02:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमुळे या भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आवश्यक दिलासा मिळेल. या प्रकल्पांमध्ये अर्जुन सहाय्यक प्रकल्प, रतौली वायर प्रकल्प, भाऊनी धरण प्रकल्प आणि माझगाव-मिरची स्प्रिंकलर प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च 3250 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर महोबा, हमीरपूर, बांदा आणि ललितपूर जिल्ह्यांतील सुमारे 65000 हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी मदत होईल आणि या क्षेत्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. या प्रकल्पांमुळे या प्रदेशाला पिण्याचे पाणीही उपलब्ध होईल. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राज्याचे मंत्री यावेळी उपस्थित होते.अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 14th, 12:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन
September 14th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.पंतप्रधान उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार
September 13th, 11:20 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार आहेत, त्यानंतर त्यांचे यानिमित्ताने भाषण होईल. पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगढ नोड येथील आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या महान व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली
March 12th, 03:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्वातंत्र्यसैनिक, चळवळ, उठाव आणि संघर्ष यांना आदरांजली वाहिली. त्यांनी चळवळी, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वांना विशेष आदरांजली वाहिली , ज्यांना भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढय़ातील कथेत योग्य ओळख मिळाली नाही. आज अहमदाबादच्या साबरमती आश्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (भारत @ 75) सुरू केल्यानंतर ते बोलत होते.‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.