राजस्थानमध्ये जयपूर इथे ‘एक वर्ष –परिणाम उत्कर्ष’ कार्यक्रम आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

December 17th, 12:05 pm

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सी. आर. पाटील, भगीरथ चौधरी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, प्रेम चंद भेरवा आणि अन्य मंत्री, खासदार, राजस्थानचे आमदार, मान्यवर व्यक्ती तसंच राजस्थानमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे 'एक वर्ष-परिणाम उत्कर्ष' या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी

December 17th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ' एक वर्ष-परिणाम उत्कर्ष':राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले . पहिल्या वर्षाने पुढील अनेक वर्षांच्या विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम केले आहे , असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचेच दर्शन घडत नाही तर राजस्थानच्या तेजस्वी प्रकाशाचे आणि विकासाच्या उत्सवाचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलीकडेच रायझिंग राजस्थान शिखर परिषद 2024 च्या वेळी दिलेल्या भेटीचे स्मरण करत यावेळी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि आज 45,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याशी संबंधित समस्यांवर योग्य तोडगा निघेल आणि राजस्थान भारतातील परस्परांशी जोडलेल्या सर्वात चांगल्या राज्यांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामांमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल तसेच राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.

संविधानाच्या स्वीकाराला 75 वर्ष झाल्यानिमित्त लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधले पंतप्रधानांचे संबोधन

December 14th, 05:50 pm

आपणा सर्वांसाठी आणि सर्व देशवासीयांसाठी इतकेच नव्हे तर जगभरातल्या लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही वेळ आहे. संविधानाचा 75 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आणि जगातल्या सर्वात महान आणि विशाल लोकशाहीचा प्रवास, यामागे असलेली आपल्या संविधान निर्मात्यांची दूर दृष्टी, आपल्या संविधान निर्मात्यांचे योगदान घेऊन आपण आज आगेकूच करत आहोत. 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे.संसदही या उत्सवात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करत आहे याचा मला आनंद आहे. मी सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो. ज्यांनी या उत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला केले संबोधित

December 14th, 05:47 pm

संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विशेष चर्चासत्राला संबोधित केले. आपण लोकशाहीचा हा उत्सव साजरा करत आहोत, ही भारतातील सर्व नागरिकांसाठी आणि लोकशाहीचा आदर करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे असे उद्गार मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना काढले. आपल्या राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या या उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण प्रवासात आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांची दूरदृष्टी, द्रष्टेपणाचे आणि प्रयत्नांचे आभार मानून ते म्हणाले की, 75 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. हा सोहळा साजरा करण्यात संसद सदस्यही सहभागी होत आहेत आणि आपले विचार व्यक्त करत आहेत याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला तसेच त्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.

JMM & Congress are running a marathon of scams in Jharkhand: PM Modi in Hazaribagh

October 02nd, 04:15 pm

Prime Minister Narendra Modi today addressed an enthusiastic crowd in Hazaribagh, Jharkhand. Kickstarting his address, PM Modi said, On this Gandhi Jayanti, I feel fortunate to be here. In 1925, Mahatma Gandhi visited Hazaribagh during the freedom struggle. Bapu's teachings are integral to our commitments. I pay tribute to Bapu. PM Modi highlighted the launch of the Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan, aimed at ensuring that every tribal family benefits from government schemes.

PM Modi addresses the Parivartan Mahasabha in Hazaribagh, Jharkhand

October 02nd, 04:00 pm

Prime Minister Narendra Modi today addressed an enthusiastic crowd in Hazaribagh, Jharkhand. Kickstarting his address, PM Modi said, On this Gandhi Jayanti, I feel fortunate to be here. In 1925, Mahatma Gandhi visited Hazaribagh during the freedom struggle. Bapu's teachings are integral to our commitments. I pay tribute to Bapu. PM Modi highlighted the launch of the Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan, aimed at ensuring that every tribal family benefits from government schemes.

इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम या जागतिक नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

August 31st, 10:39 pm

ईटी वर्ल्ड लीडर्स फोरमच्या या कार्यक्रमात येणं म्हणजे…कितीतरी जुने चेहरे दिसताहेत…तर ही एक आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की इथे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली चर्चा झाली असेल. आणि ही चर्चा अशावेळी झालीय जेव्हा संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित

August 31st, 10:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेच्या यशाची झलक केली सामायिक

August 28th, 03:37 pm

जन धन योजना या आर्थिक समावेशन कार्यक्रमाला आज 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेमधील 10 वैशिष्ट्यपूर्ण आकड्यांवर एक पोस्ट सामायिक केली आहे.

जनधन योजनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांचे अभिनंदन

August 28th, 12:51 pm

आज जनधन योजनेचा 10 वा वर्धापन दिन आहे. आर्थिक समावेशनाच्या प्रक्रियेवर या योजनेचा सकारात्मक प्रभाव पडला आहे. त्याचेच महत्व विषद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमीत्त या योजनेचे यश साजरे केले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच ही योजना यशस्वी करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. आर्थिक समावेशनाला चालना देण्यात तसेच कोट्यवधी लोकांना, विशेषत: महिला, युवा आणि उपेक्षित समुदायांना सन्मान मिळवून देण्यात जनधन योजना सर्वाधिक महत्वाची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 13th, 09:33 pm

सर्वात आधी मी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सर्व सदस्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना आज मुंबईत एक भव्य आणि आधुनिक वास्तू मिळाली आहे. या नव्या वास्तूमध्ये तुमच्या कामकाजाचा जो विस्तार होईल, तुमची काम करण्यातील सुलभता वाढेल त्यामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होईल, अशी मला आशा वाटते. इंडियन न्यूजपेपर सोसायटी ही संस्था आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी देशात कार्यरत असलेल्या संस्थांपैकी एक आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या देशाच्या वाटचालीतील प्रत्येक चढ-उतार देखील फार जवळून बघितला आहे, ते क्षण तुम्ही प्रत्यक्ष जगला आहात आणि जन-सामान्यांना त्याबद्दल सांगितले देखील आहे; म्हणूनच, एक संस्था म्हणून तुमचे कार्य जितके अधिक प्रभावी बनेल तितका देशाला त्याचा अधिकाधिक फायदा होईल.

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन

July 13th, 07:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल मधील जी-ब्लॉक येथील इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) सचिवालयाला भेट दिली आणि आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन केले. नवीन इमारत मुंबईतील आधुनिक आणि कार्यक्षम कार्यालयाबाबत आयएनएसच्या सदस्यांच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करेल आणि मुंबईतील वृत्तपत्र उद्योगासाठी 'नर्व्ह सेंटर ' म्हणून काम करेल.

घरांप्रमाणेच देशही महिलांशिवाय चालू शकत नाही: पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे

May 21st, 06:00 pm

वाराणसी येथील महिला संमेलनात केलेल्या हृद्य भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारसच्या लोकांवर आपला अतूट विश्वास असल्याचा पुनरुच्चार केला तसेच गेल्या दशकात आपल्या सरकारने महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या दिशेने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. प्रचाराच्या काळात त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

पंतप्रधान मोदींचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे महिला संमेलनात भाषण

May 21st, 05:30 pm

वाराणसी येथील महिला संमेलनात केलेल्या हृद्य भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारसच्या लोकांवर आपला अतूट विश्वास असल्याचा पुनरुच्चार केला तसेच गेल्या दशकात आपल्या सरकारने महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या दिशेने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. प्रचाराच्या काळात त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाची 60 वर्षे वाया घालवली: पंतप्रधान मोदी बिहारच्या चंपारणमध्ये

May 21st, 11:30 am

बिहारमधील चंपारण येथे एका उत्साही सार्वजनिक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने परिवर्तनात्मक प्रवास केला असल्यावर भर देत हीच गती पुढे सुरू ठेवणे तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: INDI आघाडीचे अपयश उघड करताना त्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण उपलब्धींवरही प्रकाश टाकला.

पीएम मोदींच्या बिहारमध्ये चंपारण आणि महाराजगंजमध्ये जाहीर सभा

May 21st, 11:00 am

बिहारमधील चंपारण आणि महाराजगंज येथे उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या परिवर्तनात्मक वाटचालीवर आणि ही गती कायम ठेवणे अत्यंत निकडीचे आहे यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: इंडी आघाडीचे अपयश उघड करताना आपल्या सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण उपलब्धी अधोरेखित केल्या.

टीएमसी असो वा काँग्रेस, ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया येथे

May 19th, 01:00 pm

पुरुलिया, पश्चिम बंगाल येथे आयोजित तुफानी प्रचार सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल श्रोतृवर्गाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती असलेली भाजपची वचनबद्धता या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत, टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.

पश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण

May 19th, 12:45 pm

पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.

काँग्रेस आणि झामुमोला विकासाचे मूलतत्त्वही कळत नाही: जमशेदपूरमध्ये पंतप्रधान मोदी

May 19th, 11:20 am

जमशेदपूर, झारखंड येथे अलोट गर्दीत झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे महत्त्व आणि ऐरणीवर असलेल्या महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रकाश टाकला. एका उत्साही जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी झारखंडच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले

पंतप्रधान मोदींची झारखंडमधील जमशेदपूर येथे प्रचार सभा

May 19th, 11:00 am

झारखंडमधील जमशेदपूर येथे एका प्रचार सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे महत्त्व आणि ऐरणीवर असलेल्या महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रकाश टाकला. सभेला उपस्थित असलेल्या उत्साही जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी झारखंडच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले.