जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान (30 सप्टेंबर - 3 ऑक्टोबर 2024) करण्यात आलेले सामंजस्य करार

October 01st, 12:30 pm

भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जमैकाचे पंतप्रधान कार्यालय यांच्यात आर्थिक समावेशकता आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

जमैकाच्या पंतप्रधानांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

October 01st, 12:00 pm

पंतप्रधान होलनेस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. पंतप्रधान होलनेस प्रथमच भारताच्या द्विपक्षीय दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळेच आम्ही या भेटीला विशेष महत्त्व देतो.पंतप्रधान होलनेस हे दीर्घकाळापासूनचे भारताचे मित्र आहेत. त्यांना भेटण्याची संधी मला अनेकवेळा मिळाली आहे. आणि प्रत्येक वेळी, त्यांच्या विचारांमध्ये मला भारतासोबतचे संबंध दृढ करण्याप्रति वचनबद्धता जाणवली आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या या भेटीमुळे आमच्या द्विपक्षीय संबंधांना नवीन ऊर्जा मिळेल तसेच संपूर्ण कॅरिबियन प्रदेशासोबत आमचे संबंध वृद्धिंगत करेल.

जमेकाच्या पंतप्रधानांकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

July 04th, 08:14 pm

जमेकाचे पंतप्रधान अँड्रयु मायकेल होलनेस यांनी दूरध्वनीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.