जालियनवाला बागेत 1919 मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना पंतप्रधानांनी वाहीली आदरांजली
April 13th, 10:41 am
जालियनवाला बागेत 1919 मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरण केलेल्या संकुलाच्या उद्घाटनावेळी केलेले आपले भाषणही पंतप्रधानांनी सामायिक केले.कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मृती भवनात बिप्लवी भारत कलादालनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 23rd, 06:05 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ जी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संबंधित सर्व मान्यवर, विद्यापीठांचे कुलगुरू, कला आणि सांस्कृतिक विश्वातील दिग्गज, स्त्री आणि पुरुषहो,शहीद दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथील विक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे उद्घाटन
March 23rd, 06:00 pm
शहीद दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.नुतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारकाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 28th, 08:48 pm
पंजाबचे राज्यपाल श्री व्ही पी सिंह बदनोरजी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, श्री अर्जुन राम मेघवालजी, श्री सोम प्रकाशजी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वैत मलिकजी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोक-प्रतिनीधी, शहीदांचे कुटुंबिय, बंधू आणि भगिनींनो!नूतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण
August 28th, 08:46 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाची झलक
August 27th, 07:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाचे शनिवारी, 28 ऑगस्टला लोकार्पण करणार आहेत. या स्मारकात विकसित करण्यात आलेल्या संग्रहालयाच्या दालनांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे स्मारक अद्ययावत करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकासकामांचे दर्शनही या कार्यक्रमातून घडणार आहे.जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी लोकार्पण
August 26th, 06:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:25 वाजता जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. ते यावेळी, स्मारकात बांधण्यात आलेल्या वस्तूसंग्रहालय दीर्घेचे उद्घाटन देखील करतील. यावेळी संकुल अद्ययावत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली जाईल.