पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या

October 02nd, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी इस्रायलच्या नागरिकांना आणि जगभरातील ज्यू समुदायाला त्यांच्या नवीन वर्षा निमित्त शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएल च्या पंतप्रधानांशी संवाद साधला

September 30th, 08:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्राएलचे पंतप्रधान म. म . बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून दूरध्वनी आला. पश्चिम आशियातील सध्याच्या घडामोडींबद्दल पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली. कोणत्याही रूपात असला तरी दहशतवादाला थारा नाही असे या संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी म्हटले. तेथील स्थानिक युद्धजन्य परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे आणि ओलीसांची सुरक्षित सुटका करणे यावर पंतप्रधानांनी भर दिला. लवकरात लवकर शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून मदतीची तयारी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. याशिवाय भारत इस्राएल मधील धोरणात्मक भागीदारीला आणखी मजबूत करण्यासंबंधातील द्विपक्षीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पंतप्रधानांनी रोश हाशाना प्रित्यर्थ पंतप्रधान नेतान्याहू व जगभरातील ज्यू धर्मियांना शुभेच्छादेखील दिल्या. यापुढेही संपर्कात राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

August 16th, 05:42 pm

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

June 06th, 08:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी आज दूरध्वनीवर त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

December 19th, 06:38 pm

पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास संघर्षाविषयीच्या ताज्या घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या हान्नुकाच्या शुभेच्छा

December 07th, 07:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तसेच जगभरातील ज्यु जनतेला हान्नुकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या संदेशामध्ये इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना देखील जोडून घेतले आहे.

कॉप 28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

December 01st, 06:44 pm

दोन्ही नेत्यांनी सध्या चालू असलेल्या इस्रायल - हमास संघर्षावर विचार विनिमय केला. पंतप्रधानांनी 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि ओलीसांच्या सुटकेचे स्वागत केले.

आभासी G-20 परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले निवेदन (22 नोव्हेंबर 2023)

November 22nd, 09:39 pm

आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.

जी 20 आभासी शिखर परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

November 22nd, 06:37 pm

मला आठवते, माझे मित्र आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला माझ्याकडे औपचारिक अध्यक्षपद सोपवले होते , तेव्हा मी सांगितले होते की, आपण सर्वजण मिळून जी -20 ला सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक बनवू. आपण एकत्रितपणे एका वर्षात हे साध्य केले आहे. आपण एकत्रितपणे जी -20 ला नवीन उंचीवर नेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद

October 28th, 08:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि या क्षेत्रावर आणि जगावर त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली.

गोव्यामधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 26th, 10:59 pm

व्यासपीठावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष भगिनी पीटी उषा जी, देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले माझे सर्व खेळाडू मित्र, मदतनीस कर्मचारी, इतर पदाधिकारी आणि युवा मित्रांनो, भारतीय क्रीडा महाकुंभाचा प्रवास आज गोव्यात येऊन पोहोचला आहे. सगळीकडे रंग आहे...तरंग आहेत...रोमांच आहे..उत्साह आहे. गोव्याच्या हवेत असेच काहीसे आहे. आपणा सर्वांना सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!

पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन

October 26th, 05:48 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गोव्यामध्ये भारतीय खेळांच्या महाकुंभाचा प्रवास सुरू झाला आहे आणि संपूर्ण वातावरण विविध रंग, लहरी, उत्साह आणि साहसाने भरून गेले आहे. गोव्याच्या तेजोवलयासारखे दुसरे काहीच असू शकत नाही असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी गोव्याच्या जनतेचे अभिनंदन केले आणि 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये गोव्याचे योगदान अधोरेखित केले आणि गोव्याच्या फुटबॉल प्रेमाचा दाखला दिला. क्रीडाप्रेमी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हीच मुळी एक उत्साहाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत चर्चा

October 19th, 08:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायलच्या पंतप्रधानांसमवेत संवाद

October 10th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून दूरध्वनी आल्यानंतर उभय नेत्यांनी संवाद साधला.

इस्रायलच्या या कठीण काळात भारतातील जनता खंबीरपणे या देशाच्या पाठीशी : पंतप्रधान

October 10th, 04:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दलची आपल्याला माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्तावर पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

October 07th, 05:47 pm

इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्ताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी भारत इस्रायलसोबत एकजुटीने उभा असून निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत भारतीयांच्या सद्भावना आणि प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

रोश हशनाहच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जगभरातील ज्यू लोकांना दिल्या शुभेच्छा

September 15th, 02:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोश हशनाह निमित्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलमधली जनता आणि जगभरातील ज्यू लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

PM praises Embassy of Israel for celebrating Hindi Diwas with dialogues from Hindi films

September 14th, 11:05 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has lauded Embassy of Israel's celebrations of Hindi Diwas through famous dialogues from Hindi films. The Prime Minister said that the effort of the Embassy is overwhelming.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलच्या पंतप्रधानांशी बातचीत

August 24th, 09:47 pm

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.

पंतप्रधानांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि तिथल्या जनतेचे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त केले अभिनंदन

April 26th, 06:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि तिथल्या जनतेचे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केले आहे.