श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
September 01st, 04:31 pm
हरे कृष्ण ! आजच्या या पुण्य प्रसंगी आपल्यासोबत उपस्थित असलेले देशाचे संस्कृती मंत्री श्री जी किशन रेड्डी, इस्कॉन ब्यूरोचे अध्यक्ष श्री गोपाल कृष्ण गोस्वामी जी आणि जगभरातल्या विविध देशांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी आणि कृष्णभक्त!श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपादजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विशेष नाण्याचे अनावरण
September 01st, 04:30 pm
श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक विभाग, पर्यटन आणि ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
August 29th, 11:30 am
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 27 डिसेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
December 27th, 11:30 am
देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.Gita teaches us harmony and brotherhood, says PM Modi
February 26th, 05:11 pm
PM Narendra Modi today unveiled the world’s largest Bhagavad Gita. Addressing the gathering, the PM termed the Bhagavad Gita to be a world heritage which has been enlightening generations across the world since thousands of years. “Gita teaches us harmony and brotherhood”, the PM added.PM Modi unveils the world’s largest Bhagavad Gita at ISKCON Temple
February 26th, 05:03 pm
PM Narendra Modi today unveiled the world’s largest Bhagavad Gita. Addressing the gathering, the PM termed the Bhagavad Gita to be a world heritage which has been enlightening generations across the world since thousands of years. “Gita teaches us harmony and brotherhood”, the PM added.