Prime Minister meets with the President of the Islamic Republic of Iran

October 22nd, 09:24 pm

PM Modi met Iran's President Dr. Masoud Pezeshkian on the sidelines of the 16th BRICS Summit in Kazan. PM Modi congratulated Pezeshkian on his election and welcomed Iran to BRICS. They discussed strengthening bilateral ties, emphasizing the Chabahar Port's importance for trade and regional stability. The leaders also addressed the situation in West Asia, with PM Modi urging de-escalation and protection of civilians through diplomacy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद

November 06th, 06:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

ब्रिक्स विस्तारावर पंतप्रधानांचे निवेदन

August 24th, 01:32 pm

सर्वप्रथम, मी राष्ट्रपती, माझे मित्र रामाफोसा जी यांना या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ सैय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

August 18th, 06:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ सैय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

23व्या एस सी ओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद

July 04th, 12:30 pm

आज या तेविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. संपूर्ण आशिया खंडात गेल्या दोन दशकांमध्ये शांतता, समृद्धी आणि विकासासाठी एस सी ओ एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. भारत आणि या प्रदेशातील हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक बंध आणि लोकांचे लोकांशी असलेले संबंध हे आपल्या एकत्रित वारशाचे जिवंत उदाहरण आहे. आम्ही हे क्षेत्र एक विस्तारित शेजार म्हणून नव्हे तर एक विस्तारित कुटुंब म्हणून पाहतो.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

March 22nd, 03:34 pm

आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)चं नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन

March 22nd, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन-ITU ) चे नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं उद्घाटन केलं.पंतप्रधानांनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट या भविष्यकालीन आराखड्याच्या उद्दिष्टनाम्याचही अनावरण केलं आणि 6G च्या संशोधन आणि विकास चाचणी उपकरणाचं (टेस्ट बेड) उद्घाटन केलं. खोदकामांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या अॅपचही उद्घाटन, त्यांनी केलं. ITU, ही माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-ICT) साठी, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली विशेष संस्था आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी, भारतानं ITU सोबत मार्च 2022 मध्ये, यजमान देश करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण या देशांना सेवा मिळून, या राष्ट्रांमधील आपापसातील समन्वय आणि या प्रदेशांना परस्पर लाभदायक ठरणारं आर्थिक सहकार्य वाढेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्‌घाटन करणार

March 21st, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्‌घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 17th, 11:51 am

मानवतेसमोर असे फार कमी प्रसंग येतात ज्यावेळी काळाचे चक्र आपल्याला भूतकाळ सुधारून नव्या भविष्याच्या निर्मितीची संधी देत असते. आज नशीबाने आपल्या समोर असाच एक क्षण आहे.

PM addresses the nation on release of wild Cheetahs in Kuno National Park in Madhya Pradesh

September 17th, 11:50 am

PM Modi released wild Cheetahs brought from Namibia at Kuno National Park under Project Cheetah, the world's first inter-continental large wild carnivore translocation project. PM Modi said that the cheetahs will help restore the grassland eco-system as well as improve the biopersity. The PM also made special mention of Namibia and its government with whose cooperation, the cheetahs have returned to Indian soil after decades.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत भेट

September 16th, 11:06 pm

उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी भेट घेतली. राष्ट्रपती रायसी यांनी 2021मधे पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरची ही पहिली भेट होती.

ईराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत चर्चा

June 08th, 07:53 pm

ईराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिराब दोल्हाहियान सध्या भारत भेटीवर असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

'अफगाणिस्तानवरील दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रात' सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तसेच सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी एकत्रितपणे पंतप्रधानांची भेट घेतली

November 10th, 07:53 pm

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेच्या 21 व्या शिखर संमेलनातले पंतप्रधानांचे संबोधन

September 17th, 12:22 pm

सर्वप्रथम मी राष्ट्रपती रहमोन यांना एससीओ परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा देतो. ताजिक प्रेसिडेंसीने आव्हानपूर्ण जागतिक आणि क्षेत्रीय वातावरणात या संघटनेचं कौशल्याने संचालन केलं आहे. ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 30 व्या वर्षानिमित्ताने, मी संपूर्ण भारतातर्फे सर्व ताजिक बंधू भगीनी आणि राष्ट्रपती रहमोन यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

June 20th, 02:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे.

PM Modi's bilateral meetings on the margins of UNGA in New York

September 26th, 11:27 pm

PM Modi held bilateral talks with leaders from several countries in the sidelines of the UNGA in New York.

सोशल मीडिया कॉर्नर 18 फेब्रुवारी 2018

February 18th, 08:45 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या भारत भेटीच्या वेळी भारत-इराणने जारी केलेले संयुक्त निवेदन (17 फेब्रुवारी, 2018)

February 17th, 07:14 pm

भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून इराणच्या इस्लामी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम डॉ. हसन रुहानी यांनी 15-17 फेब्रुवारी या काळात भारताला भेट दिली.

इराणच्या अध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी

February 17th, 02:56 pm

इराणच्या अध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले प्रेस निवेदन

February 17th, 02:23 pm

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले की भारत आणि इराण प्राचीन काळापासून जोडलेले आहेत. नेत्यांनी प्रभावी व परिणामकारक चर्चा केली. दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि सुरक्षा आणि प्रादेशिक विषयांमध्ये सहकार्य वाढविण्यास सहमती दिली.