पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधणार संवाद
December 09th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले भाषण
October 06th, 12:31 pm
स्वामित्व योजनेमुळे जो आत्मविश्वास, जो विश्वास गावांमध्ये निर्माण झाला आहे तो लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट झळकत आहे आणि मी आज या ठिकाणी देखील पाहत आहे, तुमच्याक़डील बांबूच्या खुर्च्या तुम्ही मला दाखवल्या, पण माझी नजर दूरवर पसरलेल्या या जनता-जनार्दनाचा जो उत्साह आहे, आकांक्षा आहेत त्यावर खिळलेली आहे. जनतेचे इतके प्रेम, इतके आशीर्वाद मिळत आहेत, त्यांचे किती भले झाले असेल, याचा मला पुरेपूर अंदाज येऊ शकतो. ही योजना किती मोठी ताकद बनून उदयाला येत आहे, हा अनुभव आता ज्या बांधवांसोबत मला बोलण्याची संधी मिळाली, त्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीमध्ये मिळाला आहे. स्वामित्व योजनेनंतर लोकांना बँकातून कर्ज मिळणे आणखी जास्त सुलभ झाले आहे.पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
October 06th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी या योजनेअंतर्गत 1,71,000 लाभार्थ्यांना ई मालमत्ता पत्रांचे वाटप केले. केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार, लाभार्थी, गाव, जिल्हा आणि राज्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 07th, 10:31 am
शिक्षक पर्व या महत्त्वाच्या कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीश्री धर्मेंद्र प्रधान,श्रीमती अन्नपूर्णा देवी ,डॉ. सुभास सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, देशाच्या विविध राज्यातील माननीय शिक्षकवर्ग, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन, त्यांच्या टीममधील सर्व मान्यवर सन्माननीय सदस्य, संपूर्ण देशभरातून आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व विद्वान प्राचार्यवर्ग, शिक्षकवर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांनो,पंतप्रधानांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास केले संबोधित
September 07th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास आभासी माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संबोधित केले. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष (श्रवण दोष असलेल्यांसाठी ऑडिओ आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा व्हिडिओ, वैश्विक शिक्षण रचनेला अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स), सीबीएसईच्या शालेय गुणपत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा, NISHTHA - निपुण भारत (NIPUN Bharat) आणि विद्यांजली पोर्टल साठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक / देणगीदार/व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदी उपक्रमांचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:02 pm
आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
August 15th, 07:38 am
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !India Celebrates 75th Independence Day
August 15th, 07:37 am
Prime Minister Shri Narendra Modi today addressed the nation from the Red Fort as the country celebrated its 75th Independence Day. During the speech, PM Modi listed achievements of his government and laid out plans for the future. He made an addition to his popular slogan of “Sabka Saath, Sabka Vikas and Sabka Vishwas.” The latest entrant to this group is “Sabka Prayas.”भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय च्या 2021 च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 11th, 06:52 pm
भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योगजगतातील सर्व धुरीणांना, सीआयआयच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, सीआयआय चे अध्यक्ष श्री टी व्ही नरेंद्रन जी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांत नियुक्त असलेले भारतीय राजदूत, बंधू आणि भगिनींनो, !भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांचे भाषण
August 11th, 04:30 pm
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ही आजची सीआयआय बैठक, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे, ही विशेष बाब आहे. भारतीय उद्योगांना नवे संकल्प करण्याची, नवी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही एक मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारताचा आपला संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी भारतीय उद्योगजगताची आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. महामारीच्या काळात, उद्योगक्षेत्राने दाखवलेल्या चिवट वृत्तीबद्दल, त्यांनी उद्योगजगताचे कौतुक केले.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्य प्रदेशातल्या लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 07th, 10:55 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि माझे खूप जुने परिचित, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आदिवासी कल्याणासाठी, जनजाती समाजाच्या उत्कर्षासाठी झिजवलं, असे मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह, राज्य सरकारचे इतर सर्व मंत्रीवर्ग, खासदार, आमदार सहकारी आणि मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेलेले बंधू आणि भगिनी!प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद
August 07th, 10:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी अधिक जनजागृती करण्यासाठी एक मोहीम सध्या सरकारतर्फे चालवली जात आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी, राज्यसरकार ही मोहीम राबवत आहे. मध्यप्रदेशात सात ऑगस्ट हा दिवस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मध्यपरदेशात सुमार पाच कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.ई-रुपी डिजिटल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 02nd, 04:52 pm
या महत्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्ट अप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारी गण, आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,पंतप्रधानांनी e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा केला प्रारंभ
August 02nd, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे e-RUPI या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचा प्रारंभ केला. डिजिटल पेमेंटसाठी e-RUPI हे रोकडरहित आणि संपर्क विरहीत साधन आहे.विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 04:00 pm
या व्यासपीठातून फ्रान्सची तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे आहेत. हे सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल.विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात बीजभाषण केले. 2016 पासून दरवर्षी पॅरिसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आणि युरोपमधील सर्वात मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक असलेल्या विवा टेक 2021 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून बीजभाषण देण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले होते.भारतीय विद्यापीठ संघटनेची 95 वी वार्षिक बैठक आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पंतप्रधानांनी केलेलं भाषण
April 14th, 10:25 am
या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी जी, गुजरातचे शिक्षणममंत्री भुपेंद्र सिंह जी, युजीसीचे अध्यक्ष प्राध्यापक डी पी सिंह जी, बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू अमी उपाध्याय जी, भारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक तेजप्रताप जी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो,पंतप्रधानांनी भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले
April 14th, 10:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले. किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांनी केले. गुजरातचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गुरू तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त (प्रकाश पर्व) आयोजित कार्यक्रमासाठी नियुक्त उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन
April 08th, 01:31 pm
समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मित्रांनो, गुरू तेगबहादूर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वाच्या या बैठकीला उपस्थित राहण्याची मिळालेली संधी म्हणजे माझे अध्यात्मिक भाग्य थोर आहे आणि हे काम एक राष्ट्रीय कर्तव्यही आहे, असे मला वाटते. यामध्ये आपलेही काही योगदान असावे, म्हणजे एक प्रकारे गुरूकृपाच आपल्या सर्वांवर झालेली आहे. आपण सर्वजण देशाच्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या या प्रयत्नांना पुढे नेत आहोत, याचा मला आनंद वाटतो.श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जन्मशताब्दी (प्रकाश पर्व) सोहळ्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक
April 08th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री गुरू तेग बहादुर जी यांचा 400वा जन्मशताब्दीसोहळा (प्रकाश पर्व) निमित्त विचारविनिमयासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्चस्तरीय समितीची बैठक झाली.