'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 28th, 11:30 am

मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र संरक्षणासाठी कार्य करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे केले कौतुक

July 29th, 02:41 pm

“आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त, व्याघ्र संरक्षणासाठी सक्रीय असणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. भारतात 75,000 चौरस फुटांपेक्षा अधिक भूक्षेत्रावर 52 व्याघ्र प्रकल्प वसलेले आहेत, ही बाब निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. व्याघ्र संरक्षणात स्थानिक समाजाला सहभागी करून घेण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत.”

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा

July 29th, 10:37 am

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.