आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे उद्योग धुरिणांकडून कौतुक
October 15th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (आयटीयू-डब्ल्यूटीएसए) 2024 दरम्यान 8 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन केले. डब्ल्यूटीएसए ही डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ संस्थेच्या मानकीकरण कार्यासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी प्रशासकीय परिषद आहे. भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रथमच आयटीयू-डब्ल्यूटीएसए चे यजमानपद भूषवत आहे. 190 हून अधिक देशांतील दूरसंचार, डिजिटल आणि आयसीटी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3,000 हून अधिक उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांना एकत्र आणणारा हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे.The goal should be to ensure that no country, region, or community is left behind in the digital age: PM Modi
October 15th, 10:05 am
Prime Minister Modi inaugurated the International Telecommunication Union-World Telecommunication Standardization Assembly and India Mobile Congress in New Delhi. In his address, he highlighted India's transformative achievements in connectivity and telecom reforms. The Prime Minister stated that the government has made telecom a means of equality and opportunity beyond just connectivity in the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयटीयू जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा 2024चे केले उद्घाटन
October 15th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा (WTSA) 2024चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 8व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटनही केले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली.पंतप्रधान 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 चे करणार उद्घाटन
October 14th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (डब्ल्यूटीएसए) 2024 चे उद्घाटन करतील.पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार
December 31st, 12:56 pm
2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. 3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.गुजरात मधल्या ‘स्वागत’ या उपक्रमाला 20 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधलेला संवाद आणि संबोधन
April 27th, 04:32 pm
माझ्याबरोबर थेट संवाद साधूया . जुन्या काळातील मित्रांना मी भेटू शकलो, हे माझं भाग्य आहे. बघूया, आधी कोणाशी बोलायची संधी मिळते.पंतप्रधानांनी घेतली इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन संस्थेच्या सचिव, डोरिन बोग्दन मार्टिन यांची भेट
March 24th, 08:28 am
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन या संस्थेच्या सचिव डोरिन बागदेन मार्टिन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. पृथ्वीच्या भल्यासाठी आणि शाश्वततेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ या विषयावर दोन्ही मान्यवरांची सविस्तर चर्चा झाली.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
March 22nd, 03:34 pm
आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)चं नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन
March 22nd, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन-ITU ) चे नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं उद्घाटन केलं.पंतप्रधानांनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट या भविष्यकालीन आराखड्याच्या उद्दिष्टनाम्याचही अनावरण केलं आणि 6G च्या संशोधन आणि विकास चाचणी उपकरणाचं (टेस्ट बेड) उद्घाटन केलं. खोदकामांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या अॅपचही उद्घाटन, त्यांनी केलं. ITU, ही माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-ICT) साठी, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली विशेष संस्था आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी, भारतानं ITU सोबत मार्च 2022 मध्ये, यजमान देश करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण या देशांना सेवा मिळून, या राष्ट्रांमधील आपापसातील समन्वय आणि या प्रदेशांना परस्पर लाभदायक ठरणारं आर्थिक सहकार्य वाढेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार
March 21st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.