दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित, इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023, या भारतीय कला, वास्तूकला आणि रचना या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 08th, 06:00 pm
प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्घाटन
December 08th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी) अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित केले. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम दिल्लीतील सांस्कृतिक ठिकाणांची ओळख करून देईल.पंतप्रधानांच्या हस्ते 8 डिसेंबर रोजी पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएननेल (आयएएडीबी) 2023 चे उद्घाटन होणार
December 07th, 02:13 pm
व्हेनिस, साओ पावलो, सिंगापूर, सिडनी आणि शारजाह येथील आंतरराष्ट्रीय बिएनालेस प्रमाणे देशात एक प्रमुख जागतिक सांस्कृतिक उपक्रम विकसित करणे आणि त्याला संस्थात्मक स्वरूप देणे हा दृष्टिकोन पंतप्रधानांनी मांडला होता. या दृष्टीच्या अनुषंगाने, संग्रहालयांचा पुनर्शोध , पुनरब्रँडिंग करणे, नूतनीकरण करणे आणि संग्रहालये नव्या ठिकाणी स्थापन करणे यासाठी देशव्यापी मोहीम सुरु करण्यात आली.तसेच कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसी या भारतातील पाच शहरांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रांच्या विकासाची घोषणा करण्यात आली. याची सुरुवात भारतीय कला , वास्तुकला आणि डिझाईन बिएननेल च्या माध्यमातून दिल्ली येथील सांस्कृतिक क्षेत्रातून होणार आहे.'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी
May 28th, 11:30 am
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 18 मे रोजी, आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शन 2023 चे होणार उद्घाटन
May 16th, 06:56 pm
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची संकल्पना, “संग्रहालये,शाश्वतता आणि कल्याण’ अशी आहे. या वस्तूसंग्रहालय प्रदर्शनामागचा उद्देश, संग्रहालयांबाबत या क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत सर्वंकष चर्चा सुरु करणे आणि भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरी मध्ये महत्वाची भूमिका पार पाडू शकतील, अशा सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती करणे हा आहे.