आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन -2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 18th, 11:00 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी जी, मीनाक्षी लेखी जी, अर्जुन राम मेघवाल जी, Louvre (लुव्र) संग्रहालयाचे संचालक मॅन्युअल रबाते जी, जगातील विविध देशांतून आलेले पाहुणे, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संग्रहालय विश्वातील दिग्गज मंडळी इथे जमली आहेत. आजचा प्रसंगही खास आहे कारण भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत आहे.पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन
May 18th, 10:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन केले. तसेच त्यांनी दिल्ली परिसरातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे देखील उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी तंत्रज्ञान मेळा, संवर्धन प्रयोगशाळा तसेच या निमित्त सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनांतून फेरफटका मारला. “संग्रहालये, शाश्वतता आणि स्वास्थ्य’ या यंदाच्या संकल्पनेसह 47 वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.