नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित आंतरराष्ट्रीय अधिवक्ता परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

September 23rd, 10:59 am

जगभरातील विधी क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींना भेटण्याची आणि त्यांच्या समवेत उपस्थितीत राहण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. भारताच्या सर्व भागातील लोक आज येथे उपस्थित आहेत. या परिषदेसाठी इंग्लंडचे लॉर्ड चॅन्सेलर आणि इंग्लंडच्या बार असोसिएशनचे प्रतिनिधीही आपल्यामध्ये आहेत. राष्ट्रकुल आणि आफ्रिकन देशांचे प्रतिनिधीही यात सहभागी होत आहेत. एक प्रकारे, ही आंतरराष्ट्रीय वकील परिषद भारताच्या 'वसुधैव कुटुंबकम' (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे) या भावनेची प्रतीक ठरली आहे. भारतातील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो. हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी मनापासून पार पाडणाऱ्या बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मी विशेष अभिनंदन करतो.

‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद -2023 याचे नवीदिल्ली येथे पंतप्रधानांनी केले उदघाटन'

September 23rd, 10:29 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘आंतरराष्ट्रीय विधिज्ञ परिषद 2023 चे उद्घाटन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विविध कायद्याच्या विषयांवर अर्थपूर्ण संवाद आणि चर्चेसाठी व्यासपीठ म्हणून कार्य करणे, संकल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कायद्याव्यवस्थेतील समस्या समजून घेणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.